ताज्या घडामोडी

प्रहार चे पिण्याच्या पाण्यासाठी नगर परिषद कार्यालय समोर मटका फोडो आंदोलन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

माजलगांव शहरामधील जुजगर गल्ली येथील रहिवासी यांना नगरपरिषदेच्या गलथान कारभारामुळे गेल्या दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहे या अगोदर येथील रहिवाशांनी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला अनेक वेळा सांगुन देखील आज करतो उद्या करतो असे म्हणुन वेळ मारून नेली त्यामुळे निगरगट्ट प्रशासनाच्या विरोधात संतप्त रहिवाशी व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नगरपरीषदेवर जुजगर गल्ली मधिल महिलांना सोबत घेऊन भव्य दिव्य हलगी टाळ वाजवीत मोर्चा काढण्यात आला त्यानंतर नगरपरिषद कार्यालयासमोर मठका फोडुन निषेध करण्यात आला या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष मानिक दळवे व mim पक्षाचे शहराध्यक्ष रशिद शेख यांनी उपस्थित राहुन पाठिंबा दिला.
यावेळी प्रहार चे तालुकाप्रमुख गोपाळ पैंजणे, नितीन कांबळे, भारत डोंगरे, प्रहार तालुकाप्रमुख संकेत लंगडे वडवणी, भागवत डोईजड, अविनाश ढगे, शहराध्यक्ष मुस्ताक कुरेशी, अनिल देशमुख, अशोक अर्जुन, दिनकर बादाडे, विकास जगताप मयुर शर्मा, महादेव डाके, काशिनाथ कुचेकर, सुनिल पवार, प्रकाश चोरमले अंबादास ढवळे, विमल जाधव स्मिता सुपेकर, शारदा सुपेकर, मनिषा उमरे, अनेक महीला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close