ताज्या घडामोडी

पाथरी येथे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा व कॅरियर संदर्भात मार्गदर्शन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दि. २२ – ऑल इंडिया आयडियल टीचर्स असोसिएशन युनिट पाथरी व स्टुडेंट इस्लामिक ऑर्गनायझेशन युनिट हयात कॉलनी पाथरी संयुक्तपणे आयोजित दिनांक २२ फेब्रुवारी रोजी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची तयारी कशी करावी आणि करिअर मार्गदर्शन करण्यात आले.
मेहबूब शाह फंक्शन हॉल साई रोड पाथरी मध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी विविध शाळांमधून २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमासाठी श्री.आदिल अहमद हाश्मी, श्री.मोहम्मद अकबर सर, इंजिनीयर श्री.फैजान दानिश या तज्ञांनी मार्गदर्शन केले. अध्यक्ष म्हणून गटशिक्षण अधिकारी पाथरी श्री. मुकेश राठोड उपस्थित होते. आणि श्री.अब्दुल हबीब अन्सारी, श्री.मोहम्मद शफी फारुकी, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. फैजान अशरफ फ़ारोकी व नियोजन श्री.इक्बाल अन्सारी यांनी केले. तोसिफ कामरान, शेख मुनव्वर, ताबिश फराज फारोकी, सय्यद मुजम्मिल, मोहम्मद वसीम अन्सारी, शेख रियाजुद्दीन,मोहम्मद तारेख अन्सारी या सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close