ताज्या घडामोडी

अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलीची शासकीय निवासी शाळेत विद्यार्थी प्रवेशोत्सव दिन साजरा

तालुका प्रतिनिधी:मंगेश शेंडे चिमुर

चिमूर येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलीची शासकीय निवासी शाळेत दि 27 जूनला विद्यार्थी प्रवेशोत्सव दिन साजरा करण्यात आला प्रत्येक विद्यार्थीनीना शाळेत प्रवेश करताना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच पाठ्यपुस्तके देण्यात येऊन हा दिवस साजरा करण्यात आला
समाजकल्याण विभाग संचलित अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलीची शासकीय निवासी शाळेत विद्यार्थी प्रवेशोत्सव दिन साजरा करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून पूनम गेडाम मॅडम महिला व बालकल्याण प्रकल्प अधिकारी उपस्थित होत्या तर अध्यक्ष म्हणून कल्पना हजारे मुख्याध्यापक उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना पूनम गेडाम यांनी शिक्षणाचे महत्व मुलींना पटवून दिले तसेच विद्यार्थीनीचा शिक्षणात उत्साह वाढावा यासाठी शाळेच्या प्रथम दिनी स्वागत करण्यात आले तसेच हजारे मॅडम नी शाळेची विद्यार्थी दशेत कसे वागावे शिस्तीचे पालन कसे करावे स्वतःला नियमाच्या चौकटीत राहून कसे कार्य केले पाहिजे शिक्षण घेताना येणाऱ्या समस्या यावर मार्गदर्शन केले यानंतर अल्पोहार वितरित करून कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेत्तर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close