वाघनख येथे राजमाता जिजाऊ,स्वामी विवेकानंद जयंती संपन्न
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
वरोरा पं.स.अंतर्गत जि.प.उ.प्राथ शाळा वाघनख येथे कोवीड 19 च्या सर्व निर्देशांचे पालन करुन १२ जानेवारी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची सयुक्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र सालेकर यांनी आपल्या मानोगतात सांगितले की, जाती धर्म भेदाभेद नाकारुन सर्व रयतेला ममतेच्या समतेच्या बंधुत्वाच्या मानवतावादी एका सुत्रात गुंफून शिवरायांना छत्रपतीच्या सिंहासनी बसवून स्वराज्याचं स्वप्न साकार करणाऱ्या स्वराज्यसंकल्पीका राष्ट्रमाता राजमाता माॕ.जिजाऊं व आपली आदर्श निसर्गपुजक मातृसत्ताक अशी महान सिंधुसंस्कृती शिकागोच्या जागतीक धर्मपरिषदेतुन विश्वाला परिचीत करुन देणारे स्वामी विवेकानंद हे दोन्ही महामानव आपल्या महान उच्च उदात्त अशा समता न्याय बंधुता या मुल्याने ओतप्रोत असलेल्या प्राचीन वैभवशाली भारतीय संस्कृतीचे पुनरस्थापक होते. आक्रमकांनी आपल्या संस्कृतीचे जातपात वर्ण स्पृष्य अस्पृष्य भेदाभेद कर्मकांड अन्यायकारक रुढी परंपरात केलेले विदृपिकरण लाथाडून तिचे पुनरुज्जीवन करण्यासाठी व सामाजिक समानता प्रस्थापित करण्यासाठी यांनी त्यांचे संपुर्ण आयुष्य खर्ची घातले. या भारतमातेच्या सुपुत्रांना आजच्या दिनी अभिवादन करुन त्यांना अभिप्रेत असलेली समता न्याय बंधुता भारतात प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येकांनी प्रयत्न करण्याचा संकल्प करावा व दरवर्षी १२ जानेवारी माॕ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचा सयुक्त जन्म दिन “समता न्याय बंधुता संकल्पदिन” म्हणून साजरा व्हावा असे आव्हान केले.
शासन निर्देशानुसार ३ जानेवारी ते १२ जानेवारी “जिजाऊ सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकिंचा” अभियान हा सप्ताह निबंधस्पर्धा, वकृत्व स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,वेषभुषा स्पर्धा… इ.स्पर्धांचे यशस्वी आयोजन करुन अभियान राबविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनराज रेवतकर सर यांनी केले,कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ.रेखा थुटे मॕडम यांनी तर आभार संतोष धोटे सर यांनी मानले.