पशुपालक बांधवाना तंत्रज्ञानाच्या माध्यामातून मार्गदर्शन रिलायन्स फाउंडेशन चंद्रपूर यांचा उपक्रम
तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर
रिलायन्स फाऊंडेशन माहीत सेवा चंद्रपूर व कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर जिल्ह्यातील पशुपालकांना डायल आऊट ऑडिओ कॉन्फरन्स च्या साहिय्याने दि. 15/09/2021 ला मार्गदर्शन करण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्यातील पशुपालकांना त्यांचा समस्या सोडवीण्या करीता व त्यावर मार्गदर्शन मिळवण्या करीता रिलायन्स फाऊंडेशन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्री धम्मदीप गोंडाने व जिल्हा प्रतिनिधी अमित मेश्राम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन डॉ. गणेश उत्तमराव काळूसे विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय)
कृषि विज्ञान केंद्र. सिंदेवही जि. चंद्रपूर यांनी पशुपालकांना गाय, म्हशी , बैल , शेळी , कोंबड्यान वरती पोक्षक आहार आपण कशा पद्धतीने जनावरांना देऊ शकतो व तो कसा घरच्या घरी तयार करता येतो यावर मार्गदर्शन केले. तसेच गोठ्याचे व जनावरांची स्वच्छता ठेवणे महत्वाचे आहे असे सांगितले.
व गोचीड निर्मूलन सुद्धा पशुपालकांना समजून दिले.
त्याचप्रमाणे शेळी व कुकुट पालन यामुळे शेतकऱ्यांना किती फायदा होऊ शकतो यांचे आर्थिक समीकरण सुद्धा पटवुन दिले.
शिवाय लसीकरणाच्या संबंधी मार्गद्शन व पावसाळ्यात घाव्याची निगा या विषयावर मा्गदर्शन केले .
या प्रसंगी चंद्रपूर जिल्ह्यातील , ८ तालुका येथील १० गावातील ३१ पशुपालकांनी या डायल आऊट ऑडिओ कॉन्फरन्स चा लाभ घेतला या प्रसंगी उपस्तीत पशुपालकांनी मिळालेल्या माहिती चा आम्हाला निश्चित लाभ होईल असे सांगितले व पशुपालकांनी व तज्ञांनी रिलायन्स फाउंडेशन च्या या उपक्रमाचे कौतुक केले.