ताज्या घडामोडी

अहेरी तहसील कार्यालयात महाराजस्व अभियानाचे शुभारंभ

जातीचा दाखला व रेशनकार्डचे वाटप

गर्दी टाळण्यासाठी महसूल कर्मचारी घरपोच सेवा देणार!

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

महाराजस्व अभियाना अंतर्गत जातीचे दाखले व शिधापत्रिका वाटपाचे शुभारंभ येथील तहसील कार्यालयात आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते शुक्रवारी 24 सप्टेंबर रोजी करण्यात आले.
यावेळी अध्यक्षस्थानी आ.धर्मराव बाबा आत्राम होते. तर मंचावर माजी जि. प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम, तहसीलदार ओंकार ओतारी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षीय स्थानावरून आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी, शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी जातीच्या दाखल्याची गरज असते. दाखला मिळविण्यासाठी गोरगरीब व दुर्गम भागातील नागरिकांची मोठी दमछाक होते, त्यामुळे अहेरी तालुक्यात मोठ्या संख्येने जातीचे दाखले तयार करून ते सुरक्षितरित्या महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्षात प्रदान करणार असून महाराजस्व अभियाना अंतर्गत नागरिकांना याचा लाभ मिळणार असल्याचे या.धर्मराव बाबा आत्राम यांनी आवर्जून सांगितले.
तर याचवेळी तहसीलदार ओंकार ओतारी यांनी, शासनाचे कल्याणकारी व लोकाभिमुख योजनेचे लाभ प्रत्येक नागरिकांना मिळण्यासाठी ‘महाराजस्व अभियाना’ अंतर्गत जातीचे दाखले, रेशनकार्ड, जमिनीचे पट्टे व अन्य महत्वाचे दस्तावेज वाटपाचे मिशनच राबविण्यात येत असून शासनाच्या विविध योजना व सोयी सवलत्या पासून कोणीही वंचित राहू नये हाच त्या मागचा मूळउद्देश असल्याचे म्हणत शासनाच्या विविध व नावीन्यपूर्ण योजना व याआधी राबविलेल्या उपक्रमांवर प्रकाश टाकले.
त्या नंतर आमदार धर्मराव बाबा आत्राम व अन्य मान्यवरांच्या शुभहस्ते कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गर्दी टाळण्यासाठी काही निवडक नागरिकांना जातीचा दाखला व लाभार्थ्यांना रेशनकार्ड वितरित करून महाराजस्व अभियानाचे शुभारंभ करण्यात आले. तदनंतर त्या-त्या गावातील तलाठी व महसूल विभागातील कर्मचारी व्यवस्थित व सुरक्षितरित्या दाखले घरपोच वितरित करणार आहेत.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रियाज शेख, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल मुक्कावार, सुरेंद्र अलोने, श्रीनिवास विरगोनवार, राहुल गर्गम आदी व प्रतिष्टीत नागरिक आणि लाभार्थी उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी रोशन दरडे, पुरवठा निरीक्षक शिल्पा दरेकर, एकनाथ चांदेकर, सत्यनारायण येनबडवार, विनोद दहागावकर, विनोद इसनकर, किशोर तलांडी, किशोर दुर्गे आदी व महसूल विभागाचे कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close