ताज्या घडामोडी
ब्रम्हपुरी शहरात नागभीड रस्त्याला ला दुभाजकाची मागणी

तालुका प्रतिनिधी:सनम रा. टेंभुर्णे ब्रम्हपूरी

ब्रम्हपुरी येथील नागभीड रस्त्यावर भराधाव गाड्यांचे व ट्राफिक चे प्रमाण भरपूर प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे नागरिकांना रस्ता ओलाडतांना बऱ्याच अडचणी निर्माण होतात.कित्येक दा ओव्हरटेक करतांना अपघात झालेले आहे. अपघाताने बऱ्याच कुटुंबातील महत्वाचे सदस्य गमावले आहेत. म्हणून येथील नागरिकांनी शासकीय तंत्रणिकेतन ब्रम्हपुरी ते लोकमान्य टिळक शाळा वडसा रोड ब्रम्हपुरी पर्यंत रस्ता दुभाजकाची मागणी आहे. जेणेकरून नागरिकांना रस्त्याने आपल्या बाजूने सुरक्षित रस्ता ओलांडता येणार याकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे.