ग्रामरोजगार सेवकांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत दिले निवेदन
ग्रामीण प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर
ग्रामरोजगार सेवक संघर्ष समितीचे वतीने चिमूर तहसील कार्यालयासमोर विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण पुकारले. राज्याचे मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले.
ग्राम रोजगार सेवकांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी चिमूर तहसील कार्यालयासमोर एक दिवशीय लाक्षणिक उपोषण केले असून शासकीय सेवेत ग्राम रोजगार सेवकांना सामावून घेणे, दि २मे २०११ चा अर्धवेळ काम करण्याचा अध्यादेश रद्द करून पूर्ण वेळ काम करण्याचा अध्यादेश काढण्यात यावे, ग्राम रोजगार सेवकांना सन २०१९ नुसार प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, ग्रामरोजगार सेवकांना मिळणारा प्रवास भत्ता दि ८ मार्च २०२१ च्या अध्यादेश नुसार बंद करण्यात आला असून तो पूर्वरत सुरू करून ८ फेऱ्यावरून १५ फेऱ्या करण्यात याव्या, ग्राम रोजगार सेवकांचे मानधन त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे, विमा कवच लागू करण्यात यावा, कोविड आजाराने मृत्यू झालेल्या ग्राम रोजगार सेवकांच्या कुटूंबियांना १० लाख रुपये देण्यात यावे, प्रलंबित भत्ता मानधन मिळण्यात यावे, कोविड १९ मध्ये निधन झालेल्या ग्राम रोजगार सेवकांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
यावेळी तालुका महिला आघाडी भाजपा अध्यक्षा मायाताई नन्नावरे,माजी न.प.सेविका छायाताई कर्चलवार,माजी सरपंच मेश्राम ताई,सौ.बोरतवारताई, नाजमा शेख यांची उपस्थिती होती