ताज्या घडामोडी
नेरी येथे 26 नोव्हेंबर ला संविधान दिनाचे आयोजन
मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
संविधान सन्मान समारोह समिती नेरी च्या वतिने बाजार चौक नेरी च्या व्यासपीठावर 26 नोव्हेंबर रोज मंगळवार ला ठिक 4 वाजता संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता संविधान जनजागृती रॅली घेऊन संविधान सन्मान समारोह समिती ठिक 4 वाजता बाजार चौक नेरी येथील व्यासपिठावर पोहचेल व कार्यक्रम सुरु होईल.
यावेळी भारताचे संविधान कोनासाठी या विषयावर तळोधी (बा.) चे विनोद लांडगे व चिमुर चे सिरी निलकंठ शेंडे यांना निमंत्रीत करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संविधान सन्मान समारोह समितीचे पदाधिकारी जॅनी पोपटे, निशा डांगे, हेमलता नागदेवते, किरण फुलझेले, विना राऊत, रत्नमाला सहारे, नाजुका इंदोरकर, सरीता जनबंधु, स्नेहदिप खोब्रागडे व विकेश जनबंधु यांनी केले आहे .