ताज्या घडामोडी
पोखर्णी फाटा येथे भाजपाच्या वतीने रास्ता रोको
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
उन्हाळ्याच्या झळा चालू झालेल्या असताना शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणी तात्काळ थांबविण्यात यावी व शिल्लक असलेल्या ऊसाचा प्रश्न निकाली लावण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा परभणीच्या वतीने नृसिंह पोखर्णी येथे रास्ता रोको आंदोल करण्यात आला.
यावेळी पाथरी विधानसभेचे माजी आमदार मोहन फड, विलास बाबर, सुरेश भुमरे, डॉ.जगदिश शिंदे, रंगनाथ सोळंके, गुलाब शेख, शंकर मामा, राजुभाऊ शिंदे, अनवर भैय्या शेख,व भाजपा चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.