नेरी पोस्ट ऑफिसची लिंक मागील अनेक दिवसापासून गायप
ग्राहक झाले हवालदिल पोस्टाची कामे कशी करावी?
प्रतिनिधीः रामचंद्र कामडी
पोस्ट ऑफिस ची इमारत अपंग वृद्धांसाठी ठरतोय त्रासदायक
नेरी येथील पोस्ट ऑफिस मध्ये गेल्या अनेक दिवसापासून लिंक नसल्यामुळे पोस्ट ऑफिसची अनेक प्रकारची कामे अडकली त्यामुळे नेरी व परिसरातील जनता हवालदिल झालेली आहे.
नेरी गाव चिमूर तालुक्यातून लोकसंख्येने सर्वात मोठे असून गावची लोकसंख्या अंदाजे 15 हजाराच्या वर आहे .मागील वर्षी नगरपंचायतची पहिली अधिसूचना निघाली तसेच या गावाला अनेक खेडेगाव जोडलेले असल्यामुळे या ठिकाणी नेहमीच पोस्ट ऑफिसमध्ये अनेक ग्राहकांची कामानिमित्त ये _जा असते परंतु पोस्ट ऑफिस ची लिंक नसल्यामुळे त्यांना आल्या पावलीच परत जावे लागते त्यामुळे ग्राहकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो.
नेरी पोस्ट ऑफिसची लिंक सतत राहत नसल्यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आपले कामधंदे सोडून व रोजी रोटी सोडून ग्राहक येत असल्यामुळे त्यांना आर्थिक फटका तर बसतोच परंतु त्यांचे आर्थिक नुकसान होते आणि त्यांचे कुठलेच काम होत नसल्यामुळे त्यांना मानसिक त्रास सुद्धा होतो .ही लिंक सुरळीत चालू करण्यासाठी 30 जून 2023 रोजी लेखी निवेदन सादर केले होते .तसेच दिनांक 10 ऑगस्ट 2023 ला रामचंद्र कामडी आणि किरण घाटे यांनी प्रत्यक्ष एस .एस .पी .ओ .चंद्रपूर यांना प्रत्यक्ष भेट देऊन याविषयीचे निवेदन सादर केले. त्यात एस. एस. पी .ओ .चंद्रपूर यांनी दोन दिवसात लिंक सुरळीत करून देण्याचे आश्वासन दिले.
नेरी पोस्ट ऑफिस दुसऱ्या मजल्यावर असल्यामुळे त्यात अपंग व वृद्धांना चढण्या व उतरण्यास कुठलीही व्यवस्था केलेली नसल्यामुळे आणि इमारतीला कुठलेही पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे ग्राहकांना आपले वाहन बाजार चौकातील मुख्य रस्त्यावर उभे करून पोस्टाची कामे करावे लागते त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो तसेच अपंग व वृद्धांना नाहक त्रास सहन करावा लागतो,ही अडचण दूर करून आणि पोस्टाची लिंक सुरळीत चालू करून द्यावी तसेच वरिष्ठांनी जातीने लक्ष देऊन लिंक चालू करून द्यावी अशी जनतेची मागणी नेरी व परिसरातील लोकांनी केलेली आहे.