ताज्या घडामोडी

खानगाव येथे नागदिवाळी महोत्सव सोहळा संपन्न

तालुका प्रतिनिधी:मंगेश शेंडे चिमुर

आदी माना जमात मंडळ मुंबई तालुका चिमूर अतगतो ग्राम शाखा खानगांव घ्या वतिने दि.२२.२३जानेवारी २०२२ला नागदिवाळी महोत्सव साजरा करण्यात आला त्यात १०वि व १२वि मधिल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता

२२जानेवारी २०२२ ला माना जमातीचा चालीरिती रुढी परंपरा जोपासण्याच्या व माना जमातीचे कुलदैवत माणिकादेवी पुजन डाहकाच्या गायणाने पार पाडण्यात आले दि.२३जानेवारी २०२२ला सकाळी ९वाजता माना जमातीचे व आदीवासी जमातीच्या उत्कर्षा करिता चळवळ निर्माण करत क्रांती घडवून आणली त्या महामानवाचे प्रतिमेचे प्रतिमिचे खानगांव ग्राम शाखा मध्ये जयघोष मध्ये मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर दुपारी २वा.जमातीला संबोधून विचार मांडण्याचे प्रत्टीने व्यासपीठावरुण विचार मांडण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.देवराव कारमेगे , प्रमुख पाहुणे श्री.बाबाराव ठावरी प्रमोद पाटील, हिराबाई दडमल ग्रा.पं.सदस्य मोरेश्वर निखाडे खानगाव प्रहार सेवक विनोद उमरे उपस्थित होते त्यांनी जमातीला संबोधन जमातीच्या विकासाकरिता व्यासपीठावरुन विचार मांडले कार्यक्रमाचे संचालन रवि भाऊ चौखे , प्रास्ताविक अनिल दडमल व आभार प्रदर्शन पुजा चौखे यांनी केले त्यानंतर जमातींच्या वतीने ग्रामवासी यांना महाप्रसाद कार्यक्रम देण्यात आला व कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close