भारतीय सेना मध्ये दाखल झालेले बारव्हा येथील प्रजय मुंगुलमारे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार
भारतीय युवा बेरोजगार संस्था कडून कौतुकाची थाप
ग्रामीण प्रतिनिधी : टिकेस्वर चेटुले दिघोरी
बारव्हा येथील अत्यंत अल्पभूधारक शेतकरी खुशाल मुंगुलमारे व शिलाबाई मुंगुलमारे यांचा एकुलता एक असलेल्या मुलगा प्रजय याला लहान पणापासून देशाची सेवा करण्याची आवड निर्माण झाली.तेव्हा पासून एकच ध्येय ठेवून पुढील शिक्षण घेत असताना भारतीय सेना आर मंड कोर नगर येथे देशाची सेवा करण्याची संधी उपलब्ध झाली.
आर मंड कोर ट्रेनिंग सेंटर नगर प्रशिक्षण पुर्ण करुन घरच्या परिवाराला भेट घेण्याकरिता गावी आले असता.गावातील युवकांनी पुढाकार घेत बस स्थानकापासून स्वागत करीत आनंद व्यक्त केला.
भारतीय युवा बेरोजगार संस्था कडून प्रजय ला भारतीय सेनेत दाखल करण्यासाठी मार्गदर्शन करत होती.आज दाखल होऊन आपल्या गावी आला आता संस्थेच्या कार्यालयात भेट दिली असता,संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष श्री बालूभाऊ चुन्ने यांच्या अध्यक्षतेखाली प्रजय यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार व पुढील वाटचालीचा शुभेच्छा देण्यात आल्या.त्या प्रसंगी संस्थेचे सचिव ललित दाणे,सुभाष दिवठे,मनोज बडोले,मोहन चुन्ने,रजनीकांत खंडारे,राजू कावळे,नितीन वखरे,अजय सोनटक्के,आदी उपस्थित होते.