अहेरी येते शाळेत नवीन वसतिगृहाची उदघाटन

जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन..!!
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
अहेरी पंचायत समिती अंतर्गत कस्तुरबा बालिका विधालय इंदाराम स्थित अहेरी,राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभिनय अंतर्गत अहेरी येतील मॉडेल शाळा अहेरी येते सुरू असुन इंग्लीश मीडियम ची शाळा आहे.या शाळेत शिकणारे बाहेरील विद्यार्थ्यांना व वर्ग 9 वी ते 12 वी शिकणारे विद्यार्थ्यांना या शाळेच्या वसतिगृहात राहून शिक्षण घेता येणार आहे.
आज सदर वसतिगृहाची उदघाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले,सर्वप्रथम सावित्रीबाईं फुले यांच्या जन्मदिनानिमित्ताने सावित्रीबाईं फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विधींवत पूजा करणयात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे,होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती सौ.गीताताई चालुरकर,जि.प.सदस्य श्री.संजय चरडुके,इंदारामचे माजी सरपंच श्री.गुलाबराव सोयाम,सामाजिक कार्यकर्ते श्री.प्रमोद कोडापे,सलीम शेख,मंचावर होते.
कार्यक्रमाचे संचालन कु.योगीता नैताम,यांनी केली.यावेळी मुख्याध्यापक श्री.रोहनकर सर,डी.वाय.ढवस मँडम,मेघा बंडावार बेडेकर सर व शिक्षक,विध्यार्थी उपस्थित होते.