ताज्या घडामोडी

श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयाच्या श्रीमती सत्यभामा मोरे राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्काराने सन्मानित

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

माजलगाव येथील श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयातील सहशिक्षीका श्रीमती सत्यभामा मोरे यांना ‘शिक्षण माझा वसा’ २०२२ चा राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
शिक्षण विवेक, टी बी लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशन सांगली आणि श्री मुकुंद भवन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिक्षण माझा वसा’ हा राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार चित्रपट दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशनचे चेअरमन किशोर लुल्ला, मुग्धा अभ्यंकर, डॉ सविता केळकर, भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह नितीन शेटे, शिक्षण विवेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पोहनेरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
हा पुरस्कार मिळाल्या बद्दल श्रीमती सत्यभामा मोरे यांचे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेंद्र आलुरकर, उपाध्यक्ष राधेश्याम लोहिया, कार्यवाह नितीन शेटे, सहकार्यवाह प्रा चंद्रकांत मुळे, डॉ हेमंत वैद्य, सौ कल्पनाताई चौसाळकर, श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलाचे पालक सुनील लोढा, अध्यक्ष प्रकाश दुगड, कार्यवाह अमरनाथ खुर्पे, अभय कोकड, प्रेमकिशोर मानधने, अॅड विश्वास जोशी, तेजस महाजन, जगदीश साखरे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा मुख्याध्यापक बाबुराव आडे गुरुजी, उपमुख्याध्यापक विजेंद्र चौधरी सर, पर्यवेक्षक उमेश थाटकर, रवींद्र खोडवे, मिलिंद वेडे, कमलाकर झोडगे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close