सरस्वती कन्या विद्यालय नेरी चे सुयश

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
शालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सरस्वती कन्या विद्यालय,नेरी येथील जुनेद शहा या विद्यार्थ्याने “वुशु” या क्रीडा प्रकारात जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावून त्याने सरस्वती कन्या विद्यालय,नेरी च्या शिरपेच्यात आणखी एक मानाचा तुरा रोवला. या यशाने संपूर्ण विद्यालयात आनंदाचे वातावरण पसरलेले आहे.जुनेद शहा हा विद्यार्थी अमरावती येथे होणाऱ्या विभागीय स्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

या यशाचे श्रेय मुख्याध्यापिका सौ.अर्चना संजयराव डोंगरे , प्रशिक्षक डॉ.सुशांत इंदोरकर, श्री. चंद्रदास ढोले सर, श्री.सुनील पोहनकर सर, वर्गशिक्षक श्री.नरहरी पिसे सर, आई, वडील व शाळेतील सर्व शिक्षक वृंदांना दिले. स्पर्धचे उदघाटन श्री विजय डोबाळे यांनी केले आयोजन शिहान विनय बोढे तर पंच मंजित मंडल, अंकुश मुलेवार , अकेश मडावी हे होते.
याप्रसंगी श्री.संजयभाऊ डोंगरे. सचिव इंदिरा ज्ञान प्रसारक मंडळ, नेरी शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगती अशीच झाली पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.