ताज्या घडामोडी

गुरांसाठी गवत आणायला गेलेल्या शेतकऱ्याचा शेतात पडून मॄत्यु

प्रतिनिधीःसंजय नागदेवे तिरोडा

तिरोडा तालुक्यातील नवेगाव खुर्द येथील शेतकरी.भाजपचे वरिष्ठ कार्यकर्ता.सेवा सहकारी संस्थेचे संचालक .नवटंकी नाटकाचे.भजन.दंडारीचे शाहीर व ढोलक वादक गुलाब रामाजी पटले वर 65वर्षे हे आज शेतात वर गुरा साठी गवत आणण्यास गेले असता .पाय घसरून
बांधीत पडल्याने मॄत्यु झाल्याने गावात सर्वत्र शोक कळा पसरली आहे .
प्राप्त माहितीनुसार तिरोडा तालुक्यातील नवेगाव खुर्द येथील शेतकरी गुलाब रामाजी पटले वर 65 वर्षे हे शेतात गुरांसाठी गवत आणण्यास गेले असता शेतावर पाय घसरून पडून शेतात मॄत्यु झाल्याची माहिती मिळताच गावातील सर्वत्र शोक कळा पसरली आहे
सदर घटनेची माहिती तिरोडा पोलीसांना देऊन तात्काळ मुंडी कोटाचे इन्चार्ज शिवलाल धावडे व अंबादे यांनी घटनास्थळ गाठुन बाॅडी तिरोडा उपजिल्हा रुग्णालय
येथे शवविच्छेदन साठी नेण्यात आले
पुढील तपास पोलीस निरीक्षक देवदास कठाळे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक शिवलाल धावडे .अबांदे इत्यादी करीत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close