टेमुर्डा येथे उमेद अभियानचे वतीने रोजगार मेळावा संपन्न
ग्रामीण प्रातिनिधी:देवानंद तुरानकर खेमजई वरोरा
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत उमेद – महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती वरोरा यांचे वतीने ७/१२/२०२१ रोजी टेमुर्डा येथे रोजगार मेळावा घेण्यात आला.
मेळाव्याचे उद्घाटन सरपंच सुचिता ठाकरे यांचे हस्ते पार पडले. त्यावेळी मंचावर सहाय्यक गट विकास अधिकारी संजय वानखेडे, विस्तार अधिकारी अरुण चनफने , बीएमएम अरुण चौधरी उपस्थित होते. उमेद- तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती वरोरा वतीने आज दिनांक ७ /१२/२०२१ रोजी ग्रामपंचायत भवन टेमुर्डा येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला.
ग्रामीण गरीब कुटुंबातील अनुसूचित जाती , जमातीच्या व अल्प संख्याक प्रवर्गातील मुलींना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी शासनामार्फत DDU GKY ही योजना राबविली जाते. त्यामध्यामातून रोजगार मेळावे आयोजित करण्यात आला. त्यावेळी मंचावर सहाय्यक गटविकास अधिकारी संजय वानखेडे सर, सरपंच सुचिता ठाकरे, विस्तार अधिकारी अरुण चनफणे सर, बी एम एम अरुण चौधरी, प्रभाग समन्वयक देशट्टिवार, साईकिरण धोटे , प्रशिक्षण संस्थेचे प्रतिनिधी इ.मान्यवर उपस्थित होते. मेळाव्यामध्ये १३ गावातील ३५ मुली व १५ सी आर पी उपस्थित होत्या. मेळावा दिन दयाल उपाध्यय ग्रामीण कौशल्य योजना अंतर्गत तालुक्यातील सुशिक्षीत बेरोजगार युवतींसाठी प्रशिक्षण व रोजगाराची संधी बाबत माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मुलींना मार्गदर्शन करतांना सहाय्यक गट विकास अधिकारी वानखेडे यांनी शासनाच्या योजनेचा पुरेपूर फायदा घेऊन स्वतःची ओळख निर्माण करावी व त्यातून कुटुंबाची जीवनोन्नती करावी असे आवाहन केले. शासनमान्य असलेल्या नागपूर येथील क्लेश व बी एबल या प्रशिक्षण संस्थेचे प्रतिनिधी यांनी उपस्थित राहून निवड पात्रता,नियम व अटी, सुविधा, जॉब याबाबत सविस्तर माहिती दिली. मेळाव्यामध्ये तालुक्यातील एस टी, एस.सी व अल्पसंख्याक प्रवर्गातील १३ गावातील ३५ मुली उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाग समन्वयक गजानन देशट्टिवार यांनी केले. प्रास्ताविक प्रभाग समन्वयक साई किरण धोटे यांनी केले. यावेळी तालुक्यातील समूह संसाधन व्यक्ती उपस्थित होत्या.