ताज्या घडामोडी

पहिले ऑनलाईन विश्व मराठी संमेलन-पुणे जिल्हा प्रतिनिधी पदी शिरुर चे डाॅ. नितीन पवार यांची निवड”

मुख्य संपादक : कु. समिधा भैसारे

पुणे,(दि.20 नोव्हेंबर): पहिल्या ऑनलाईन विश्व मराठी संमेलनाच्या पुणे जिल्हा प्रतिनिधी पदी शिरुर चे डाॅ. नितीन पवार यांची निवड निवड करण्यात आली आहे. डाॅ. नितीन पवार यांनी “हाॅस्पिटल मॅनेजमेंट” मध्ये डाॅक्टरेट केली आहे.ते कवी,पत्रकार, लेखक व ब्लॉग लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. सामाजिक व राजकीय कार्यकर्ते म्हणूनही ते महाराष्ट्रात परिचित आहेत. ’12 कोटी मराठी बांधवाना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जोडण्यासाठी प्रयत्न करणारी विश्व मराठी परिषद सक्षम, समर्थ आणि समृद्ध अशा वैश्विक मराठी भाषिक समाजाचे स्वप्न पहात आहे. त्या उद्देशाने विश्व मराठी परिषदेने २८, २९, ३० आणि ३१ जानेवारी २०२१ दरम्यान ४ दिवसांचे ऑनलाइन विश्व मराठी संमेलन आयोजित केले आहे. यांमध्ये एक दिवसाचे स्वतंत्र विश्व मराठी युवक संमेलन होणार आहे. संमेलन पूर्णतः निःशुल्क आहे. १२ कोटी मराठी भाषिकांचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वैश्विक स्तरावर असे संमेलन प्रथमच होणार आहे.
साहित्य, संस्कृती आणि उद्योजकता असे संमेलनाचे तीन मुख्य पैलू आहेत. एक दिवस खास युवकांच्या उपक्रमांसाठी राखून ठेवला आहे. या संमेलनामध्ये चर्चा, परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण, कविकट्टा, वाचनसंस्कृतीसंबंधी उपक्रम, ऑनलाईन ग्रंथ/वस्तू प्रदर्शन, उद्योग – रोजगार संधींची उपलब्धता, उपयुक्त माहितीची देवाणघेवाण, इ. बहुविध उपक्रम सादर केले जाणार आहेत.’अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. शेतकर्यांनी आपले मनोगत, शेतीतील नवीन प्रयोग,उपक्रम, कविता, कथा, संस्कृती, जेष्ठ शेतकर्यांचे अनुभव, मनोगते इ.चे 4 ते 8 मिनिटांचे व्हिडिओ या संमेलनासाठी पाठवावेत, असे आग्रही प्रतिपादन डाॅ. नितीन पवार यांनी केले आहे. त्यासाठी 7776033958 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी शेतकरी बांधवांना केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close