आ. बंटीभाऊ भांगडिया यांची सदिच्छा भेट
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
आ. कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी चिमूर तालुक्यातील गरडापार येथील शामराव नन्नावरे यांच्या शेतात आयोजित स्नेहभोजनाच्या कार्यक्रमानिमित्त सदिच्छा भेट दिली आणि नन्नावरे कुटुंबिय व उपस्थित मान्यवरांशी वार्तालाप करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रामुख्याने भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. श्यामजी हटवादे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजूभाऊ देवतळे, भाजपा ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाकडे, भाजपा ज्येष्ठ नेते घनश्यामभाऊ डुकरे, भाजपा महिला मोर्चा प्रदेश चिटणीस ममताताई डुकरे, भाजपा युवा नेते समीर राचलवार, सं.गां.नि.अ.यो. समिती अध्यक्ष संजय नवघडे, भाजयुमो चिमूर शहराध्यक्ष बंटी वनकर, भाजयुमो तालुका महामंत्री रोशन बन्सोड, भाजयुमो चिमूर शहर महामंत्री अमित जुमडे, भाजयुमो चिमूर शहर महामंत्री निखिल भुते, मनी रॉय, नरेंद्र हजारे, हर्षल डुकरे, राकेश दडमल, अमर दडमल व अन्य मान्यवर उपस्थित होते.