ताज्या घडामोडी

संविधान दिनानिमित्त गोंडपिपरी येथील एल.के.महाविद्यालय व कृषी कार्यालयास संविधान उद्देशिका प्रत सप्रेम भेट

ग्रामीण प्रतिनिधी:महेश शेंडे विठ्ठलवाडा

संपूर्ण भारतात दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ रोजी संविधान दिन साजरा झाला. गोंडपिपरी शहरात तथा तालुक्यातील विविध गावातून रॅलीद्वारे व गावोगावी ध्वजारोहण करून संविधान दीन साजरा करण्यात आला.


भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधान राष्ट्राला समर्पित केले.अखंड भारताची एकता व अनेकता बंधूतेने नटलेली असावी. कायदा व हक्क प्रत्येकाला योग्यतेनुसार मिळायला पाहिजे. भारत देश सार्वभौम ,लोकशाही, समाजवादी, धर्मनिरपेक्ष गणराज्य घडला पाहिजे. प्रत्येकात व्यक्तीची, राष्ट्राची, समानतेची, दर्जाची, संधीची बंधुता संविधानातून प्राप्त झाली पाहिजे.असे हे भारतीय संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राष्ट्राला समर्पित केले.व सर्वांना अंगीकृत व अधीनियमित करून जगण्याचा मार्ग शिकविला.
भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून गोंडपिपरी बौद्ध महासभा अध्यक्ष राजू झाडे यांचेसह तालुका काँग्रेस कमिटी गोंडपिपरी चे पदाधिकारी यांचे हस्ते एल.के.महाविद्यालय व कृषी कार्यालय गोंडपिपरी यांना भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे ची प्रत सप्रेम भेट देण्यात आली.
प्रसंगी तुकाराम झाडे तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी गोंडपिपरी, रेखाताई रामटेके तालुकाध्यक्ष महिला काँग्रेस गोंडपिपरी, देवेंद्र बट्टे शहराध्यक्ष काँग्रेस गोंडपिपरी, राकेश पुन माजी सभापती बांधकाम विभाग नगरपंचायत गोंडपिंपरी, सुनील फुकट काँग्रेस कार्यकर्ता गोंडपिपरी, महाविद्यालयीन कर्मचारी, विदयार्थी व कृषी विभागीय अधिकारी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close