ताज्या घडामोडी

भगसिंग कोष्यारी यांच्या वक्तव्याने चिमुरात संतप्त पडसाद

चिमूर तालुका शिवसेनाचे जोडे मारो आंदोलन .

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे

छत्रपती शिवाजी महाराज यांचे विषई राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याने तीव्र पडसाद चंद्रपूर जिल्हा सहित चिमूर तालुकात पण उमटले, शिवसेना चिमूर तालुकाच्या वतीने आज 22 नोव्हेबर रोजी हुतात्मा स्मारक समोर निषेध आंदोलन करण्यात आले,
महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना त्वरित पदावरून हटवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालची पाठराखण करीत आहे त्यांनी जनतेची माफी मागावी, राज्यपाल शिवद्रोही असल्याचा आरोप यावेळी माजी शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते यांनी यावेळी केला, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमृत नखाते, चिमूर विधानसभा समन्वयक भाऊराव ठोंबरे यांचे उपस्थितीत आंदोलन करण्यात आले,
यावेळी माजी शिवसेना तालुका प्रमुख सारंग दाभेकर, सोंदरी ग्राम पंचायत सरपंच तथा उपतालूका प्रमुख केवळराम पारधी, माजी उपजिल्हा प्रमुख अनिल डगवार, तालुका संघटक रोशन जुमडे, तालुका समन्वयक देविदास गिरडे, उपतालुका प्रमुख रामभाऊ धारणे, निवासी उपतालुका प्रमुख सुधाकर निवटे, माजी उपतालुका प्रमुख मनोज तिजारे, विभाग प्रमुख राजेंद्र जाधव, चिमूर शहर प्रमुख सचिन खाडे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख राज बुचे, प्रसिध्दी प्रमुख सुनील हिंगनकर, ओम थुटे, गोपाळ भजभुजे, उपस्थित होते .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close