ताज्या घडामोडी

तळोधी (नाईक) येथे शिवजयंती कार्यक्रम

ग्रामीण भागातील नागरिकांनी वाईट व्यसनाकडे दुर्लक्ष करावे……..राजु देवतळे .

आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी शिवजयंती च्या शुभेच्छा दिल्या.

ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी

शिवाजी महाराजांच्या जन्म झाला त्या सोळाव्या शतकात क्रूर परिस्थिती मुळे अराजकता पसरली होती.तेव्हा सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी मा जिजाऊ नी शिवरायास शिक्षण देऊन संयमी शासक नेतृत्व करीत अराजकतेचा बिमोड केला असे भाजप ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे म्हणाले की आपल्या मतदार संघात आमदार बंटीभाऊ भांगडीया जातीभेद चे राजकारण न करता सामाजिक समरसता ठेवण्याचे कार्य करीत आहे. आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी शिवजयंती निमित्ताने शुभेच्छा दिल्या असून आमदार साहेब आपल्या गावाच्या पाठीशी असल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात महिलांना सन्मान मिळत होता ते आदर्श घेऊन आपले आमदार साहेब महिलांना मान सन्मान देण्याचे कार्य करीत आहे. मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील महिला वाईट व्यसनाकडे वळत असल्याची खंत व्यक्त केली.
तळोधी ( नाईक) येथील शिवसैनिक मंडळ च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव शिव जयंती उत्सव प्रसंगी भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे बोलत होते.
भाजप तालुका कोषाध्यक्ष रमेश कंचर्लावार, माजी सरपंच कलीम शेख सरपंच संजय येसांबरे ग्राम पंचायत सदस्य शीतल श्रीरामे ,सूनन्दा रंदये प्रकाश धानोरकर वनरक्षक बलकी अंकाडे ,मधुकर वाडरे गुलाब दहिकर आदी उपस्थित होते.
दरम्यान कोरोना काळात सेवा देणाऱ्या आशा वर्कर साडी चोळी तसेच गुरुदेव भक्त गण यांना ग्रामगीता व प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे सुद्धा पुस्तक देऊन सत्कार करण्यात आले.
संचालन कलीम शेख यांनी केले. गावकरी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close