ताज्या घडामोडी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत जास्तीत जास्त युवकांना प्राधान्य देवू

मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे

आज गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस भवन, गोंदिया येथे आढावा बैठक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री मेहबूब भाई शेख, प्रदेश कार्याध्यक्ष श्री रविकांत वरपे, माजी आमदार श्री राजेंद्र जैन, आमदार श्री मनोहर चंद्रीकापुरे, जिल्हाध्यक्ष श्री विजय शिवनकर, महिला अध्यक्ष श्रीमती राजलक्ष्मी तुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली. गोंदिया व भंडारा जिल्हा हा धान उत्पादक शेतकर्‍यांचा असून या भागाचे पालकत्व मा.श्री प्रफुल पटेल जी यांनी घेतले आहे. श्री पटेल साहेब यांच्या प्रयत्नामुळेच महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना ७०० रुपये बोनस देऊन धान उत्पादकांना मोठा दिलासा दिला आहे. दोन्ही जिल्ह्यातील जलसिंचन व प्रलंबित सिंचन प्रकल्पाचे कामे मार्गी लावण्यासाठी सातत्याने मा.श्री पटेल जी यांनी जलसंपदा मंत्री मा.श्री जयंत पाटील साहेब यांच्या सोबत बैठक घेऊन प्रश्न निकालात काढण्यासाठी अधिकार्यांना निर्देश दिले आहे. ओबीसी चे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय घटनात्मक आरक्षण मा.श्री शरदचंद्र पवार साहेब यांनी मिळवून दिले. मागील भाजप सरकार च्या चुकीमुळे व केंद्र सरकारा च्या चुकीच्या धोरणामुळे ओबीसी चे आरक्षण अडचणीत आले हे ओबीसी बांधवांना पटवुन देण्याची वेळ आली आहे. तसेच युवकांनी गावा गावात बूथ कमिटी तयार करून युवकांना जास्तीत जास्त स्थान द्यावे. आगामी जिल्हा परिषद, नगर परिषद निवडणूकांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस सज्ज असली पाहिजे या बाबत सविस्तर प्रदेशाध्यक्ष व प्रदेश कार्याध्यक्ष यांचा कडून मार्गदर्शन करण्यात आले व येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत जास्तीत जास्त युवकांना प्राधान्याने उमेदवारी देण्यात येईल असे उपस्थित मान्यवर यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले. सदर बैठकीला राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष संघटन, मजबुती व आगामी काळात येणाऱ्या निवडणुका इत्यादी बाबींवर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी सर्वश्री राजेंद्र जैन, मेहबूब शेख, रविकांत वरपे, मनोहर चंद्रिकापुरे, विजय शिवणकर, राजलक्ष्मी तुरकर, किशोर तरोणे, रफिक खान, ऍड नेहा शेंडे, केतन तुरकर, अरुण असबे, सौरभ मिस्रा, शैलेंद्र तिवारी, लोकपाल गहाणे, विनायक शर्मा, दिनेश कोरे, नितिन टेभरें, रविकुमार पटले, नीरज उपवंशी, आर.दि अग्रवाल, इम्रान शेख, रंजित टेभरें, दिलप्रीतशिंग वोरा, रोहित पटले, माधुरी सहारे, श्रुती कावळे, स्वाती स्वाती दमाहे, सायमा खान, रुपाली रोटकर, सौरभ रोकडे, एकनाथ वाहिले, चेतन कुंभारे, चाहत मेश्राम, आकाश नागपुरे, नियाज शेख, त्रिलोक तुरकर,संकेत पटले, विजय कोल्हे, प्रमोद महाजन, रवींद्र मस्करे, अनिल रहांगडाले, प्रवीण बीजेवार, कमलेश बारेवार, राजकुमार बोपचे, गुड्डू ठवरे, आशिष चौधरी, यश रहांगडाले, देवेश्वर रहांगडाले, विक्रांत तुरकर, राजेश तुरकर, भूमेश्वर पारधी, राजेश गोटेफोडे, भवानी बैस, खुशाल वैद्य, राजेश येरणे,विप्लव वाघाये, टिपु सय्यद, राजेंद्र पटले, अनुराग बोरकर, निमेद मेश्राम, विशाल पडवार, अमन घोडीचोर, संघर्ष ऊके, नितेश ठोणेकर, धिरज रामटेके, भारत पागोटे, रोहित मुनेश्वर, नितिन चकाले, नितेश येल्ले, बसंत गणवीर, सुनील पटले, शैलैश वासनिक, आशिष येरणे, योगेश बिसेन, मोंटी अन्सारी, सतिश पारधी, श्रीधर चन्ने, विरेंद्र कुमार मुरकुटे, योगेश डोये, निखिल राऊत, लव माटे, रमन उके, प्रतिक भालेराव, कान्हा बघेले, नागो बन्सोड, विशाल ठाकुर, नागरतन बन्सोड, दर्पण वानखेडे, नाजीम खान, प्रतिक वानखेडे, कृष्णा भांडारकर, राजेशकुमार तायवाडे, अजय दरवडे, बबलु कटरे, अजय दरवडे, सचिन उके, सागर राऊत, निरज नागरे, सागर भरणे, राकेश पराते, पियुष मिश्रा, शशांक खापेकर, अनमोल देशमुख, कपील बावनथडे,भुपेश गौतम, अखिलेश तुरकर, समिर लांजेवार, प्रशांत बालसनवार, राजेश नागपुरे, निकास गावळ, समस्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी गोंदिया राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या जिल्हाध्यक्ष पदी श्री केतन तुरकर यांच्या नियुक्ती चे पत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देवुन अभिनंदन करण्यात आले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close