खेर्डा महादेव येथे सर्पमित्राने दिले पाच फूट कोबरा नागाला जीवदान
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी तालुक्यातील खेर्डा महादेव येथे श्री माणिक पानजंजाळ यांच्या घरात साप निघाल्याने गल्लीतील वातावरण भयभीत झाले. तिथे विनायक आमले यांनी त्यांचे मित्र असलेले खेडुळा येथील गणेश डुकरे सर्पमित्र यांना तात्काळ घटनेची सूचना मोबाईल वरून दिली. घटनेची बातमी लागतात सर्पमित्र गणेश डुकरे यांनी तात्काळ धाव घेत माणिक पानजंजाळ यांच्या घरात तब्बल दोन तास अटो काट प्रयत्न करून घराच्या भिंतीत लपून बसलेल्या कोब्रा नागाला जिवंत पकडून ग्रामस्थांना भयमुक्त केले. या कामी त्यांना गावातील तरुण दिग्विजय आम्ले, मुबारक शेख, गोविंद आम्ले, हशम शेख, नारायण आमले आदींनी मोलाचे सहकार्य केले. वयाच्या केवळ सतराव्या वर्षी एवढे धाडसी कार्य केल्यामुळे गावातील प्रतिष्ठित श्री त्रिंबक महाराज आम्ले यांनी सर्पमित्र गणेश डुकरे यांचे कौतुक केले. याप्रसंगी बोलताना सर्पमित्र गणेश डुकरे यांनी सापाला कधीही नमारता जीवदान देण्याचे सांगितले, आणि कधीही साप दिसला तर आम्हाला तात्काळ त्यांचा मोबाईल नंबर 9021953749 वर कॉल करून बोलवा आम्ही तो पकडून नेऊ आणि त्याला जीवदान देऊ असे आश्वासन दिले.
अशी माहिती श्री प्रताप आम्ले यांनी दिली.