अमरपुरी भान्सुली येथे गळगळाट नसतांना मोहफुलाच्या झाडावर पडली विज

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर
चिमुर तालुक्यातील खडसंगी वरुन तिन कि.मी. अंतरावर असलेल्या अमरपुरी भान्सुली येथे एका मोहाच्या झाडावर विज पडली.
दिनांक ९ / ७ / २०२१ ला अतुल खोब्रागडे यांच्या शेतात ४ .१५ मिनिटांनी आभाळात कुठेही गळ्गळाट व पाऊस नसतांना मोह फुलाच्या झाडावर अचानकरीत्या नैसर्गीक गळगळाट होऊन विज पडली व झाडाचे दोन भाग झाले ते मोहफुलाचे झाड ३५ ते ४० वर्ष जुने आहे विज पडली तेव्हा काही शेतकरी तलावा शेजारी आपले बैल चारत होते त्यांनी विज पडतांना स्वता पाहीले आहे. असा प्रकार पहील्यांदाच बघीतला असे त्या शेतकऱ्यांचे म्हणने आहे. या घटनेची पर्यावरण प्रेमींना माहीती होताच पर्यावरण प्रेमी तिथे जाऊन झाडाची पहाणी केली व आपली नाराजी व्यक्त केली या घटनेत कोनतीही जिवितहानी झाली नाही पण पाऊस नाही गळगळाट नाही आणी अचानक विज पडल्यामुळे गावातील नाग्रीकांनमध्ये चर्चेचा विषय झाला आहे.