आरमोरी तालुक्यातील शेतकऱ्यांना युरीया खतांची टंचाई
जादा दराने युरियाची विक्री करित असल्याचा आरोप.
जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारींना दिले निवेदन.
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
भारत हा कृषी प्रधान देश आहे.भारतातील मुख्य व्यवसाय म्हणून शेती ओळखले जाते.अनेक शेतकरी शेतीवरच उदरनिर्वाह करतात.परंतु सध्याची धान पिकासाठी शेतकऱ्यांना युरीया खतांसाठी परिस्थिती बघता शेतकऱ्याची सर्व बाजूने लुटमार होत असुन तात्काळ आरमोरी तालुक्यातील शेतकऱ्यांना एम आर पि दरात युरीया खतांचा पुरवठा करण्यात यावे अन्यथा तालुका कृषी अधिकाऱ्यांला घेराव घालु असा इशारा गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम याच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून ईशारा दिला आहे.आरमोरी तालुक्यात कोणतेही उद्याेग धंदे नसल्यामुळे आपल्या वडीलोपार्जीत असलेल्या शेतीमध्ये बहुतेक तालुक्यातील शेतकरी शेती पिक घेत असुन यात जवळपास एकोनविस हजार शेतकरी असुन मुख्य खरीप धान पिक घेऊन वर्षभराचा कुटुंबाचा गाळा चालवित असतात. तालुक्यातील देलनवाडी ,मानापुर,मोहझरी, वैरागड कासवी यासह अन्य गावातील परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते.सध्या धानाच्या वाढी करिता युरिया रासायनिक खताची अत्यंत आवश्यकता असते. अशा वेळेस शासनाकडून पाहिजे तेवढा युरिया खत वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे खाजगी कृषी केंद्र धारकाकडून युरिया खताची साठवणूक करून खताच्या प्रचंड किमती वाढवून शेतकऱ्यांची आर्थिक लूटमार मोठ्या प्रमाणात केली जात आहे.
एकीकडे शासन आणि कृषी विभाग तर्फे विविध योजना शेतकऱ्यांसाठी राबवून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास कसा साधता येईल यासाठी शासन प्रयत्नशील असते परंतु सध्याची परिस्थिती शेतकऱ्यांची इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था निर्माण झालेली असल्याचे चित्र दिसत आहे.त्या अनुषंगाने देलनवाडी, मानापूर सह तालुक्यातील अन्य परिसरामध्ये खाजगी कृषी केंद्र धारक युरिया खत शासकीय दरापेक्षा जास्त म्हणजे 350 ते 400 रुपये या चढ्या दराने विक्री करून शेतकऱ्यांला हवालदिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे .युरिया खत घेतांना शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारचा बिल दिला जात नाही आणि शेतकरी जर विचारले बिल द्या म्हटले तर त्यांना बिल संपले आहेत उद्या मिळणार असे उडवा उडविचे उत्तर दिले जात आहे.सध्या धानाच्या वाढीकरिता युरिया खताची अत्यंत गरज असताना खताचा काळा बाजार खाजगी कृषी केंद्र धारका कडून अवाढव्य किमतीमध्ये शेतकऱ्याला पर्याय नसल्यामुळे चढ्या भावाने रासायनिक खते विकत घ्यावे लागत आहे. ही मोठी एक शोकांतिका आहे.केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या नावाने खताची सबसिडी दिली जाते. याचा फायदा कोणाला करतात.परंतु सध्याची धान पिकासाठी शेतकऱ्यांची युरीया खतांसाठी परिस्थिती बघता शेतकऱ्याची सर्व बाजूने लुटमार होत असल्याने तात्काळ आरमोरी तालुक्यातील शेतकऱ्यांना एम आर पि दरात युरीया खतांचा पुरवठा करण्यात यावे अन्यथा तालुका कृषी अधिकाऱ्यांला घेराव घालु असा इशारा गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम याच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून ईशारा दिला आहे.