ब्रम्हपूरी येथे ट्रकच्या धडकेत विद्यार्थीनीचा जागीच मृत्यु

प्रतिनिधी:कल्यानी मुनघाटे
आज दिनांक 12/01/2024 ला ब्रम्हपुरी शहरात दुपारच्या सुमारास ट्रकच्या धडकेत एका विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळ जनक घटना घडली .
मृतक विद्यार्थीनीचे नाव समिक्षा संतोष चहांदे वय वर्षे 17 असे असुन मृतक युवती मालडोंगरी येथील रहीवासी आहे.
मृतक युवती ही आंबेडकर विद्यालय ब्रम्हपुरी येथे इय्यता 12 वी ची विद्यार्थीनी होती विद्यालयात जात असतांना धान्य वाहातुक करणाऱ्या ट्रकने तीच्या सायकल ला मागुन धडक दिली त्यात ट्रकचे चाक शरीरावरून गेल्याने समिक्षाचा जागीच मृत्यु झाला . ही घटना नेवजाबाई हितकरणी विद्यालया जवळ काही अंतरावर घडली . समिक्षा च्या पश्चात आई बाबा बहीन भाऊ असा खुप मोठा आप्त परिवार आहे . कुटुंबातील मोठी मुलगी गेल्याने चहांदे परिवारावर दुख्खाचा डोंगर कोसळला असून गाव शोकसागरात बुडालेला आहे. घटनेचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत.