ताज्या घडामोडी

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी रूपाली चौधरी तर उपाध्यक्षपदी सुवर्णा चौधरी यांची निवड

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडीच्या धुळे शहर अध्यक्षपदी रूपाली प्रमोद चौधरी तर उपाध्यक्ष पदी सुवर्णा नितीन चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. या शिवाय संघटकपदी सिमा चौधरी यांची निवड झाली आहे.महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा प्रदेश अध्यक्ष खासदार रामदास तडस, कार्याध्यक्ष अशोक व्यवहारे, प्रदेश महासचिव डॉ भूषण कर्डिले, कोषाध्यक्ष गजानन शेलार, समन्वयक सुनील चौधरी, सेवा आघाडी अध्यक्ष सुभाष पन्हाळे, युवा आघाडी प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी, प्रदेश महिला अध्यक्ष पुष्पा बोरसे, जिल्हा अध्यक्ष कैलास काळू चौधरी, विभागीय अध्यक्ष विद्या करपे, यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय कार्याध्यक्ष वैशाली नरेंद्र चौधरी, जिल्हा अध्यक्ष छाया कल्याण करनकाळ आदिंनी त्यांचे नियुक्तींना संमंती दर्शविली आहे.
महापौर व भाजप प्रदेश उपाध्यक्ष जयश्री कमलाकर अहिरराव, तैलिक महासभेचे प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी व जिल्हा अध्यक्ष छाया करनकाळ यांच्या हस्ते शहर अध्यक्ष रूपाली चौधरी, शहर उपाध्यक्ष सुवर्णा चौधरी, संघटक सिमा चौधरी यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी जयश्री अहिरराव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, महिलांनी समाज संघटनसाठी पुढे यावं व महिला सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न करून परिवारासह समाजाचे नाव मोठे करावे. माझे सर्वोपरी सहकार्य राहील . छाया करनकाळ या वेळी बोलताना म्हणाल्या कि रुपाली चौधरी यांनी शहरात तेली समाज महिलांचे संघटन करावे आपल्या कार्यकाळात विविध उपक्रम/कार्यक्रम आयोजित करावेत धुळे शहर महिला आघाडी कार्यकारिणी तयार झाल्यावर सर्व महिला पदाधिकारी यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात येईल. रूपाली चौधरी यांनी सांगितले की, माझ्यावर सोपविलेल्या जबाबदारी व विश्वास टाकल्याबद्दल वरिष्ठ पदाधिकारी व सर्व महिला आघाडी पदाधिकारी यांचे आभार मानते ,लवकरच धुळे शहर महिला आघाडी कार्यकारिणी सर्वांना सोबत घेऊन जाहीर करेल असे सांगितले. या वेळी युवा आघाडी विभागीय उपाध्यक्ष तुषारदादा चौधरी, प्रमोद चौधरी, विजय महाले, सजन चौधरी, कल्पेश चौधरी, नटराज चौधरी, पप्पूशेठ अहिरराव, विनोद चौधरी, नितीन चौधरी, मुकेश किशोर थोरात व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या सर्व महिला पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष छाया करनकाळ, विभागीय कार्याध्यक्ष वैशाली नरेंद्र चौधरी, दिपाली चौधरी, हेमलता चौधरी, रिटा बागुल, मनिषा चौधरी, अलका चौधरी, रुपाली चौधरी, सुवर्णा चौधरी, निरंजनी चौधरी, प्रियंका चौधरी, वर्षा चौधरी, सिमा चौधरी, मनिषा राजेंद्र चौधरी आदि उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close