मानवत तालुक्यातील कोल्हा ते कोथाळा डांबरीकरण रस्त्यासाठि ७ कोटि मंजुर
५ ऑगस्ट रोजी कामाचे भूमिपूजन आ. सुरेशरावजी वरपुडकर याच्यां हस्ते
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मानवत तालुक्यातील कोल्हा ते कोथाळा रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली होती यासाठि ग्रामस्थांच्या वतीने रस्त्याची मागणी वारंवार होत होती या बाबत आमदार सुरेशरावजी वरपुडकर यांनी याचा शासनाकडे सतत पाठपुरावा करुन सात कोटि ५० लाख रुपये या रस्त्यासाठि निधी मंजुर करुन आणले असुन ५ ऑगस्ट रोजी या कामाचे भूमिपूजन होणार आहे.
मानवत तालुक्यातील कोल्हा ते कोथाळा या रस्त्यासाठी पाथरी विधानसभेचे आमदार सुरेशरावजी वरपुडकर साहेब यांच्या पाठपुराव्याला यश आले असून सात कोटी पन्नास लाख रूपये या डांबरीकरण रस्त्यासाठी मंजूर केले आहे. हे काम तात्काळ सुरू होणार असुन ५ ऑगस्ट रोजी या कामाचे भूमिपूजन आमदार सुरेशरावजी वरपुडकर याच्यां हस्ते होणार असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख अनील जाधव यांनी दिली आहे.