ताज्या घडामोडी

हजरत सय्यद शाह तुराबुल हक यांच्या मानाची संदलद्वारे ऊरूस यात्रेची सुरुवात

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दि. 01/02/2023.बुधवार रोजी महान सुफी संत हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहेब यांची परभणी येथील दरगाह सर्व धर्म समभावाचे, एकात्मतेचे प्रतिक असून, सर्व जिल्हावासियांची हे श्रध्दास्थान आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज दुपारी रेल्वे स्टेशन परिसरातून हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहेब यांच्या मानाच्या संदलची शहरातून मिरवणुक काढुन ऊरूस यात्रेची सुरुवात झाली.
यावेळी आमदार डॉ. राहूल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक रागसुधा आर., निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, वक्फ मंडळाचे विभागीय अधिकारी व ऊरुस समितीचे व्यवस्थापक खुसरो खान, जिल्हा वक्फ अधिकारी अब्दुल रफिक आदी उपस्थित होते. मागील 116 वर्षापासून या मानाच्या संदलची परंपरा आजतागायत कायम असून, या यात्रेला देश व राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी संदलचा तबक डोक्यावर घेवून संत हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहेब यांच्या ऊरूस यात्रेला मानाच्या संदलाने सुरुवात झाली. नागरिकांनी या उरूस उत्सवात सहभागी होवून कायदा व सुव्यवस्थाचे पालन करून शांततेत पार पडावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close