ताज्या घडामोडी
कर्जाला कंटाळून तरुणाची आत्महत्या
परतूर तालुक्यातील धकादायक घटना…
जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी
परतूर तालुक्यातील आष्टी येथील अंतरावर असलेल्या भगवान नगर येथील एका तरुणाने कर्जाला कंटाळून जीव गमावला असल्याचे चर्चिले जात आहे.
फिर्यादि नामे रावसाहेब बापूराव दराडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की मयत मुलगा नामे अशोक रावसाहेब दराडे वय २८ वर्ष स्टेट बँक ऑफ इंडिया आष्टी शाखेकडून कर्ज घेतले परंतु घेतलेल्या कर्जाची परतफेड न झाल्याने व या वर्षी सोयाबीन, कापूस या पिकाचे पावसाच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असून आता कर्ज कसे फेडणार म्हणून या तरुणाने शेतातील विहिरीत आत्महत्या केल्याचे सांगितले आहे.