ताज्या घडामोडी

सोनूली येथील शेतकऱ्याची स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

तालुका प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे नागभीड

नागभीड तालुक्यातील तळोधी पोलिस स्टेशन अंतर्गत सोनूली येथील शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने । परिसरात खळबळ माजली आहे . बंडू मोहन सुकारे ( ३५ ) रा . सोनूली , असे मृतक शेतकऱ्याचे नाव असून सकाळी ११ वाजताच्या सुमारास सदर शेतकरी नेहमी प्रमाणे आपल्या शेतावर गेला . त्या मागोमाग त्याचा मोठा भाऊ सुध्दा शेतावर गेला होता . दरम्यान बंडू त्याचा मोठ्या भावाला दिसेनासा झाला व शेतातील विहिरी च्या काठावर बंडू ची चप्पल व अंगातील जर्किन दिसून आला व बंडूनी विहिरीत उडी घेतली असणार असा अंदाज घेऊन मोठ्या भावाने गावात घरच्यांना माहिती देऊन गळ आणून गळ विहिरीत टाकला . तर गळाला अटकून बंडूचा मृतदेह वर आला . सदर घटनेची माहिती तळोधी पोलिसांना मिळताच घटना स्थळ गाठून पंचनामा व शवविच्छेन करून घरच्यांना प्रेत देण्यात आले . मृतकाच्या मागे आई , पत्नी , मुलगा व मुलगी व भाऊ असा परिवार असून सदर शेतकऱ्यानी मृतक शेती करण्याची जिद्द मनात आणून काही लोकांची शेती किराया बढ़ाने केल्या त्यासाठी सदर मृतक शेतकऱ्यानी खाजगी व काही बँकेकडून कर्ज घेतले होते . सततच्या नापीकी मुळे व यावर्षी सुध्दा मृतक शेतकऱ्याला पाहिजेत तेवढे धानाचे उत्पन्न झाले नाही . त्यामुळे कर्जाचा डोंगराला प्रवृत्त होऊन आत्महत्या केली असा अंदाज तेथील नागरिक बोलत आहेत . पुढील तपास नागभीड

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close