हतीच्या सोंडाने चिरडून हल्ल्यात मृत्यू पावलेल्या इसमाच्या कुटुबियांची खासदार अशोक नेते यांची सांत्वना भेट
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
आरमोरी तालुक्यातील मौजा- शंकरनगर पोस्ट- जोगीसाखरा तालुका आरमोरी येथील स्व.कौशल्या राधाकांत मंडल वय -६५ वर्ष ह्या दि.२९ डिसेंबर २०२३ रोजी आपल्या परिववारांसोबत शेतात पाणी देण्यासाठी शेतशिवारात काम करतांना अचानक हतीचा कळप आला. त्या कळपात सदर महिला कौशल्या मंडल सापडल्याने हिचा हतीच्या सोंडाने चिरडून हल्ल्यात जागीच मृत्यू झाला.
या घटने संबधित माहीती मिळाल्यावर गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी त्यांच्या शंकर नगर या गावी जाऊन त्यांच्या दुःखात सामील होऊन कुटुंबियाचीे भेट घेत,त्यांचे दुःख सावरत सांत्वन करत खासदार अशोक नेते यांच्याकडून यावेळी आर्थिक मदत सुद्धा देण्यात आली.
यावेळी खासदार अशोक नेते यांनी वनविभागाचे अधिकारी तथा वनपरिक्षेत्राधिकारी साल विठल यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून शासन स्तरावर लवकरात लवकर मदत देण्याचे निर्देश देत हतीच्या कळपाला या परिसरातून हाकलून लावण्या संबंधी सूचना केल्या.
याप्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री सदानंद कुथे,तालुकाध्यक्ष पंकज खरवडे,जिल्हा सचिव नंदुभाऊ पेठ्ठेवार,शंकरनगर च्या सरपंच अनिता मंडल, हरीदास मंडल, पोलिस पा.गोपाल सौरनकार, रंजन राय,दिपक सरदार,अशोक चक्रवती,बाहोतोश राय,तसेच गावातील बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.