शिवाजी पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज, भिसी येथे एअरक्राफ्ट मॉडेल प्रशिक्षणाचे आयोजन

प्रतिनिधी: विश्वनाथ मस्के
भिसी : शिवाजी पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज, भिसी येथे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाविषयी आवड निर्माण करण्यासाठी एअरक्राफ्ट मॉडेल प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना विमानाची रचना, उड्डाणाची मूलभूत तत्त्वे, एअरोडायनॅमिक्स तसेच एअरक्राफ्ट मॉडेल तयार करण्याची सविस्तर माहिती देण्यात आली.
या प्रशिक्षणाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. नितेश सर, सचिव – शिवाजी पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज, भिसी हे होते . त्यांनी विद्यार्थ्यांना साध्या साहित्याचा वापर करून एअरक्राफ्ट मॉडेल तयार करण्याची पद्धत, त्याचे संतुलन व उड्डाण कसे घडते याचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शाळेच्या प्रांगणात पार पडलेल्या या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता व नवकल्पनांची गोडी निर्माण झाली, असे मत शिक्षकवर्गाने व्यक्त केले.









