ताज्या घडामोडी

जिल्हाधिकारी परभणी यांच्या मार्फत आरोग्य आयुक्त मा.तुकाराम मुंडे यांना निवेदन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

सविता अनिल ढेंबरे रा .वसमत वय 24 जात मातंग या महिलेचे दिनांक 31 आक्टोबर 2022 दुपारी 1 वाजता सिजर करण्यात आले. त्यावेळी बाळ व महिला सुरक्षित होते. दिनांक 1 नोव्हेंबर 2022 च्या पहाटे 2 च्या सुमारास सविताची अचानक तबेत खराब झाली व तिला झटका येऊन श्वासोच्छ्वास त्रास होऊ लागला त्यामुळे तिच्या आईने नर्सला सांगीतले परंतु त्यांनी ना ऑनकाॅल डॉक्टरला कळविले नाही.तसेच रात्रपाळीला ज्या डाॅक्टर ड्युटी होती तिही घरी जाऊन झोपली होती.तसेच सविताला ऑक्शीजनची आवश्यकता होती परंतु तेथील नर्स ने रिकामे असलेले तीनही स्लेंडर वापरले तथापी सविताला वेळेवर ऑक्शीजन व योग्य उपचार न मिळाल्यामुळे तिचा जिल्हा रूग्णालय परभणी येथेच सकाळी 5:30 वाजता मृत्यू झाला.सरकारी दवाखान्यात मृत्यू झालेला असतांना मृत्यू सविताला दुस-या दवाखान्यात स्वतः वरील जिमेदारी झटकण्यासाठी प्रयत्न केला.
तसेच त्याचं दिवशी दुसरी मोरे वय 25 वर्षे नावाची महिला देखील आशाच पध्द्तीने मृत्यू झालेला. त्या अनुषंगाने काल नानालपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. व आज मा.जिल्हाधिकारी परभणी यांच्या मार्फत आरोग्य आयुक्त मा.तुकाराम मुंडे यांना या प्रकरणी निवेदन देण्यात आले यावेळी कुणाला गायकवाड,पप्पुराज शेळके, एल डी कदम, कृष्णा कटारे अरूण सोनवणे याच्या वतीने निवेदन देण्यात आले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close