ताज्या घडामोडी

हादगाव पाथरगव्हाण येथे राबवली स्वाक्षरी मोहीम

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी तालुक्यातील कासापुरी सर्कल आणि हादगावात शुक्रवारी २८ ऑगष्ट रोजी घराेघरी जात परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालया साठीची स्वाक्षरी मोहीम.
परभणीचे खा संजय उर्फ बंडू जाधव यांच्या नेतृत्वात जिल्हाभर राबवली जात असलेली स्वाक्षरी मोहीम आता गाव,वाडी,तांड्यावर पोहोचली आहे.या साठी शिवसेने सह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस,रिपाई,मनसे,सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यात सक्रीय सहभागी झाले आहेत. शुक्रवारी हादगाव येथे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे यांनी हादगाव येथे जात स्वाक्षरी मोहीम राबवण्या आदी गावकुसातील हानुमान मंदिरात महाआरती वफलआहाराचे आयोजन करून ग्रामस्थांशी संवाद साधला.त्या नंतर शिवसेना शाखेच्या वतीने स्वाक्षरी मोहिम राबवण्यात आली.या वेळी युवासेना उपजिल्हाधिकारी रामचंद्र आम्ले,पांडुरंग शिंदे,प्रताप शिंदे आयोजक विजय नखाते, भारत नखाते,हनुमान झिंजान, बाबा नखाते ,अरुण झिंजान,अनिल नखाते,माऊली नखाते, कैलास नखाते, विजय ज्ञानेश्वर नखाते, गणेश नखाते व गावातील जेष्ठ नागरीक व गांवकरी यांची या वेळी उपस्थिती होती तर कासापुरी पं स गणात पंचायत समिती सदस्य शरद कोल्हे यांच्या नेतृत्वात पाथरगव्हाण बु. येथे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.या वेळी पं स सदस्य शरद कोल्हे,गंगातात्या घाडगे, सुनील बप्पा घाडगे,बाळासाहेब घाडगे, बाळासाहेब काळे, श्याम घाडगे,तुकाराम दादा,माऊली घाडगे, दिनू घाडगे,बाबा वरकड,विट्ठलचैर्मन,भारत घाडगे,वामन नवघरे, बालासाहेब कोल्हे,सुनीलबप्पा घाडगे,आणि इतर उपस्थित होते, यावेळी ग्रामस्थांनी, तरुण मित्र मंडळी मोठया प्रमाणात प्रतिसाद दिला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close