ताज्या घडामोडी
के.के.एम.महाविद्यालयात वीर बालदिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि 26 डिसेंबर 2025 रोजी महाविद्यालयात शीख धर्माचे दहावे धर्मगुरु गुरु गोविंद सिंग यांच्या मुलांच्या, साहेबजादा जोरावर सिंग आणि साहेबजादा फतेह सिंग यांच्या अजोड शौर्य आणि बलिदानाची आठवण म्हणून वीर बालदीवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रा.एस. जी. ढालकरी, पर्यवेक्षक प्रा.ए. एम कापसे, डॉ. एस. बी. राऊत, प्रा पवार एन एस, प्रा घणवट एस बी, प्रा. अनिल सोळंके,प्रा. बोबडे मॅडम, प्र.कार्यालयीन अधीक्षक श्री. जी. पी. उबाळे तसेच मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बी.एन. होगे यांनी केले. तर आभार प्रा. बी.डी. भिसे यांनी मानले.









