ताज्या घडामोडी

कामठी येथील मुलीवर मुडिकोटात अत्याचार

शहर प्रतिनिधी : संजय नागदेवे तिरोडा

कामठी येथील 14 वर्षाची मुलगी आपल्या नातेवाईका कडे तिरोडा तालुक्यातील मुडिकोटा येथे पाहुणी आली होती. दरम्यान तिच्या नातलग असलेल्या महिलेच्या मुलीने तिला फिरण्या करीता रात्री गावात बाहेर नेले त्या वेळी चिखली येथील 16 वर्षीय मुलाने गावा बाहेर नेत तिच्यावर अत्याचार केला. मुलीने सर्व आपबिती आपल्या आईला सागितली. त्यावरून तिरोडा पोलीसांनी त्या मुला विरोधात गुन्हा दाखल केला असून सदर मुलगा तिरोडा तालुक्यातील चिखली येथील आहे.
वृत्त असे की कामठी येथील कुटुंब आपल्या आत्याच्या गावाला मुडिकोटा येथे 25 एप्रिल रोजी आले होते आत्याची मुलगी पीडित मुलीला रात्री 9 वाजता फिरायला म्हणून गावा बाहेरील तळया कडे घेऊन गेली. त्यावेळी तिच्या आत्याच्या मुलीने दोन मुलांना फोन करून बोलावून घेतले त्यानंतर तो व एक मुलगा आला ती व मुलगा गावा बाहेर असलेल्या बस स्थानकात मेंढा येथील 17 वर्षीय मुला सोबत बोलत बसली त्या मुला सोबत असलेल्या दुसऱ्या 16 वर्षीय चिखली येथील मुलगा पीडित मुलीच्या सोबत बोलायला लागला बोलता बोलता मुडिकोटा तळया कडे गेले त्या मुलाने पिडीत मुलीच्या ईछे विरोधात तिच्या वर बळजबरी करत अत्याचार केला .
कामठी येथे परतल्यानंतर 27 एप्रिल रोजी त्या मुलीने घडलेली हकीकत सागितली त्यामळे मुलीच्या आईच्या तक्रारी वरुन तिरोडा पोलीसांनी 16 वर्षीय मुला विरोधात गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास तिरोडा पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक राधा लाळे करीत आहेत .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close