दारूबंदी तसेच चुकीचे शेतकऱ्या बद्दल परिपत्रक हटविण्याच्या विरोधात सामाजिक युवा ब्रिगेड संघटनेचे एक दिवशीय धरणे आंदोलन
आठ दिवसाचा दिला अल्टिमेट.
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
सामाजिक युवा ब्रिगेड संघठनेचे अध्यक्ष अमोल सेवादास निनावे यांनी दारूबंदी हटविण्याचे विरोधात तसेच नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50000रु प्रोत्साहन म्हणून मिळणारे पैसे न मिळाल्यामुळे व शेतकऱ्यांचे सातबारे घेऊन धान्य न घेण्याचा परिपत्रक काढल्यामुळे दि 09/06/2021 रोज बुधवारला एक दिवशीय धरणे आंदोलन करून सरकारचा निषेध व्यक्त केले . तसेच हे चारही विषय लवकरात लवकर मंजूर न झाल्यास येणाऱ्या आठ दिवसात आणखी साखळी उपोषण तसेच मुंडन आंदोलन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. दि 06 जूनला महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्रात मंत्री विजय वडेट्टीवार साहेब यांचा अनेक विसंगत मुद्यांचा समावेश असलेला लेख वाचला. दारूबंदीच्या समर्थनापासून दारूबंदीत काहीच अर्थ नाही असा भूमिकेत झालेला बदल मांडला असून तो एक कळीचा मुद्दा आहे. रमनाथ झा समितीच्या अहवालानुसार वडेट्टीवार यांनी आपली दारूबंदी उठवण्याची भूमिका ठरवली नाही. घटनाक्रम असा घडला की, त्यांनी आधी दारूबंदी उठविण्याची भूमिका जाहीर केली आणि मग तिचं समर्थन करण्यासाठी समिती बनवली. समितीचा अहवाल व आकडेवारी उपलब्ध होण्याआधी दारूबंदी उठविण्याचे कारण घडले होते. निवडणुकांआधी सत्तेत आल्यास दारूबंदी उठवू अशी भूमिका घेतल्याने निवडणूक निधीत दारू लॉबीने बरीच मदत केल्याचे लोकांत बोलले जाते. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीची योग्य अंमलबजावणी झाली नाही याचे कारण म्हणजे जिल्ह्यात उत्पादन शुल्क व पोलिसांचे विशेष पथक स्थापन करणे गरजेचे होते आणि पुरेशी व्यसनमुक्ती केंद्र नव्हती असे मंत्री महोदय यांनी मांडले आहे. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सत्तेत असताना दारूबंदीची अंमलबजावणी व्हावी म्हणून त्यांनी लेखात नमूद केलेल्या उपरोक्त उपाययोजना करणे गरजेचे असताना दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेणे ही बाब विसंगती दर्शविणारी आहे. दुसरा अत्यंत हास्यास्पद मुद्दा मंत्री वडेट्टीवार यांनी मांडला की, जिल्ह्यात दारूबंदी उठावी म्हणून २ लाख ४३ हजार निवेदने प्रशासनाला प्राप्त झाली. प्रत्यक्षात दारू लॉबीने स्वतःहून अशी निवेदने लिहून गर्दीच्या ठिकाणी लोकांच्या सह्या घेतल्या. प्राप्त झालेले निवेदने ही त्याच व्यक्ती संघटना किंवा संस्थेने लिहिली आहेत अथवा नाहीत याबाबत कोणतीही पडताळणी झालेली नाही. बोगस व बनावट निवेदनांच्या आधारावर लिकर लॉबीच्या प्रेमापोटी त्यांची वकिली मंत्री महोदय करताना दिसणे हे दुर्दैवीच. चंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर मंत्री वडेट्टीवार जेव्हा जिल्ह्यात परतले तेव्हा त्यांचे स्वागत करण्यासाठी महिला, सुजान नागरिक किंवा सेवाभावी संस्था आल्या नाहीत. लिकर असोसिएशनने त्यांचे स्वागत केले त्यातून हा निर्णय मंत्रीमहोदयांनी कोणाच्या हितासाठी घेतला हे स्पष्ट झाले. दारूबंदी होण्याअगोदर २०० रुपये कमविणारा व्यक्ती ५० रुपयांची दारू प्यायचा आणि १५० रुपये घरी घेऊन जायचा. आता दारूबंदी मुळे अवैध दारू २०० रुपयांची झाल्याने तो घरी काहीच घेऊन जात नाही आणि कुटुंबात कलह सुरू झाले असा युक्तिवाद मंत्री वड्डेट्टिवार यांनी मांडला त्यातून त्यांचे समाज जीवनाविषयी असलेले चुकीची धारणा लक्ष्यात येते . अर्थशास्त्रातील मागणी व पुरवठा सिद्धांतानुसार जेव्हा मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असतो तेव्हा मालाचे दर वाढतात. याचाच अर्थ वडेट्टीवार साहेब यांचे म्हणण्यानुसार बंदीनंतर दारूचे दर वाढले असतील पूर्वीपेक्षा दारूचा पुरवठा कमी झाला होता हे स्पष्ट होते. वाढलेल्या दराने पिणाऱ्यांचे पिण्याचे प्रमाण देखील घटले.60% लोकांनी दारू महाग झाली म्हणून दारू पिणे बंद केलेले आहे असे अनेक चित्र आम्ही आमच्या नजरेसमोर नवरगाव तसेच सिंदेवाही तालुक्यामध्ये बघितले आहे. आज 70रुपयाला एक दारूचा टिलू मिळत असेल तर तो एकच पिऊन समाधानी होऊन घरी जाणार पण तोच टिलू 50रु ला दोन मिळत असेल तर मात्र अगोदर तो जागेवरच दोन पिणार आणि आणखी मग एक खिश्यात भरून घरी घेऊन जाणार व बायको पोरांच्या सामोरे पिऊन नागीण डान्स करणार. हि सत्य परिस्थिती मी स्वता माझ्या डोळ्यांनी दारू सुरु असताना बघितली आहे. त्यामुळे दारू हि कायमचीच बंद असायला पाहिजे. दारू बंदी मुळे कोणताच सरकारचा फायदा होणार कि नाही हा विचार नं करता गोरगरीब जनता दारू पासून कशी दूर ठेवता येणार तसेच त्यांचे कुटुंब कसे त्या पासून वाचविता येणार याकडे मा. महोदय पालकमंत्री तसेच राज्यमंत्री वडेट्टीवार साहेबांनी विचार करायला पाहिजे. अनेक बलात्कार विरोधात कायदा आहे म्हणून समाजात बलात्कार थांबत नाही. चोरी करणे गुन्हा आहे म्हणून चोऱ्या थांबत नाही. मात्र कायदे असल्याने समाजविघातक शक्तींपासून संरक्षण मिळते व समाजस्वास्थ्य टिकून राहते. दारूबंदीचा कायदा केल्याने संपूर्ण दारूच बंद व्हावी अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. मात्र जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर येथील एक तृतीयांश दारू कमी झाली ही बाब स्वागतार्ह आहे.
दारूबंदी उठवल्यामुळे जिल्ह्यात आर्थिक परिस्थिती चांगली झाली असे ते बिनदिक्कत खोटं लिहितात. अहो, अजून दारूबंदी तर उठायचीच आहे. केवळ मंत्रिमंडळाचा निर्णय झाला असून अद्याप अधिसूचना आलेली नाही.वास्तविक पाहता साहेब तुम्ही आघाडी सरकार निर्माण झाल्यानंतर दारू बंदी हि चंद्रपूर मधील कशी कडक अमलबजावणी करून बंद करता येणार या कडे किमान एक वर्ष तरी लक्ष्य दयायला पाहिजे होते. जेव्हा दारू बंदी कडक अंलबजावणी होऊन सुद्धा सुरूच राहत असेल तर मात्र मग सरसकट दारू सुरु करायला पाहिजे होते. आज अस झालेला आहे कि फक्त तुम्ही जी लोक दारू विकतात त्यांचीच बाजू मंत्र्यालयात मांडले पण कधी गोरगरीब लोकांचा किंवा महिला मंडळींचा विचार करून योग्य निर्णय घेतले नाही असे मला वाटते. निर्णय चुकीचा घेतले अस पण मी म्हणार नाही पण निर्णय घेताना केवढं एक तर्फी घाईत घेतलेला निर्णय आहे असे मला आवर्जून सांगावासा वाटतो. कारण आम्ही स्वता सामाजिक युवा ब्रिगेड संघटनेच्या वतीने प्रत्येक गावात दारू बंदी विषयी सतत दोन वर्ष लोकांना जनजागृती करून दारूचे होणारे दुषपरिणाम त्यांना पटवून दिलो होतो. अनेक खेडे विभागात त्या गोष्टी लोकांनी मान्य सुद्धा केले. अनेक गरिबांचे मुलं जे शाळेत टाकू श हीकत नव्हते अश्यां लोकांचे मुले शाळेत जाऊन योग्य शिक्षण घेऊ लागले. वार्डा वार्डात होणारे नागीण डान्स बंद झालेले आहेत. स्त्रियांना वर्षातून एक साडी मोठ्या मुशकीलने मिळायची आता ते वर्षातून स्वता त्यांचे नवरोबा 10 साड्या घेऊन देत आहेत त्यामुळे एक प्रकारची नवचेतना महिला मध्ये तसेच शिक्षण घेणाऱ्या मुलांमध्ये निर्माण झालेली आहे.त्यामुळे साहेब जी दारू बंदी तुम्ही उठवून राहले ती जशीच्या तशीच ठेवून आणखी फक्त एक वर्ष कठोर निर्णय करून चांगले कडक ips अधिकारी लावून अंलबजावणी करावे असे मला वाटते. जे ग्रामपंचायतीमध्ये आहेत तिथे एक कमेटी नेमून त्यांना काही पोलिसासारखे अधिकार देऊन. दर महिन्याला काही प्रोत्सहन बक्षीस दिले तर गावात कोणीच दारू विकण्याचा प्रयत्न सुद्धा करणार नाही. स्वतः मी सतत एक वर्ष नवरगाव मध्ये रात्रौ दिवसा दारू पकडून लोकांना विकू देत नव्हतो. त्यात मला माराच्या धमक्या सुध्या आलेल्या होत्या.म्हणून माझे हात जोडून नम्र विनंती आहे कि जी पिढी आज चांगल्या मार्गावर जात आहे अश्या तरुण पिढीवर तसेच महिल्या वरती दारुसुरु करून अन्याय नाही केले तर बर होणार साहेब. एवढंच करायचं आहे तर मग महाराष्ट्र सरकार निर्माण होताना जे शेतकरी लोकांनी नियमित कर्ज फेडलेले आहेत त्यांचे कर्ज माफ करून आपण 50000रु प्रोत्सहन म्हणून देणार होते पण अजूनही ते शेतकऱ्यांना मिळालेले नाही. या गोष्टीकडे आवर्जून लक्ष्य दयावे साहेब. आपल्या क्षेत्रात कामाला गती कशी मिळेल याकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागाचा म्हणण्यापेक्षा क्षेत्राचा कसा विकास झाला आहे. तसाच विकास आपल्या क्षेत्रासह जिल्हाचा करण्यासाठी उपाय योजना करावी. हाच मोलाचा सल्ला समजून पालकमंत्री या नात्याने कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे. हिच आपल्या कडून शेवटची आशा बाळगतो.या सर्व गोष्टी चा विचार करता सामाजिक युवा ब्रिगेड च्या सर्व पदाधिकारी तसेच सदश्यनी सिंदेवाही तहसील सामोरे एक दिवशीय धरणे आंदोलन करून सरकारचे लक्ष्य वेधून घेतले तसेच ते आठ दिवसाच्या आत मान्य न झाल्यास मुंडन आंदोलन व आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला आहे. या आदोंलनात सामाजिक युवा ब्रिगेड संघठनेचे अध्यक्ष्य श्री अमोल सेवादास निनावे, सदश्य प्रणय गायकवाड, अर्चना कुंभरे, महेश गिरडकर,अतुल पेंदाम, कलाम शेख, मुमताज शेख, नकील शेख, सौ. मंदा मसराम, सीमा मसराम, जयश्री कुंभरे, धुरवता मेश्राम इत्यादि तसेच अन्य सदश्य व शेतकरी लोक उपस्थित होते.