अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल चाळे करणारा शिक्षक फरार

शहीद मिश्रा विद्यालयातील एन, सी, सी क्लब ची घटना,
तालुका प्रतिनिधी:संजय नागदेवे तिरोडा
तिरोडा तालुक्यातील व पुरातन काळातील नावाजलेली सुप्रसिद्ध शाळा शहीद मिश्रा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अशी असून ह्या शाळेतील एन, सी, सी, क्लब चा शिक्षक सुनील शेंडे वय 56 वर्षे रा. गांधी वार्ड तिरोडा याने त्याच शाळेत वर्ग 10 वी ची विद्यार्थीनी ही एन, सी, सी मध्ये सिनीयर असून एन, सी, सी करत होती. परंतु एन, सी, सी शिक्षकाच्या नियतीत खोटं आल्याने शिक्षक विद्यार्थीनी सोबत अश्लिल चाळे करून तिला जिवाने मारण्याची धमकी देऊन आपली मक्तेदारी स्थापित करुन कायम ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात नरभक्षक शिक्षक अपयशी ठरला. अशी माहिती पोलीसांत तक्रार होताच उघड कीस आली,

प्राप्त माहिती नुसार तिरोडा येथील नावाजलेली शाळा शहीद मिश्रा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ह्या शाळेत ग्रामीण भागातून विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेण्यासाठी येतात परंतु पाच सहा वर्षा पासून येथील एन, सी, सी शिक्षकाची मती खराब झाल्याने त्याने आपल्या एन, सी, सी क्लब च्या विद्यार्थीनी सोबत अनेक दा अश्लिल चाळे करून आपला वर्चस्व कायम ठेवून त्याचा मनोबल वाढत गेला व त्याचा फायदा नेहमी घेत राहीला, पण त्या शिक्षकाने त्या वर्ग 10 वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थीनी वाघिणी सोबत अश्लिल चाळे करून त्या वाघिणी ने पोलीसा ची हवा दाखवून सर्व प्रकार उघडकीस आणले.
सदर शिक्षकांनी त्या अल्प वयीन विद्यार्थीनी ला आपल्या मोह मायात फसवुण तिला आलमारीच्या मागे नेवून तिच्या सोबत अश्लिल चाळे करण्याचा प्रयत्न करीत असताना त्याला झटका मारून पळ काढला व आपल्या जिवाची अब्रू कायम ठेवली व घटनेची सर्व माहिती आपल्या आई वडीलाना देऊन तात्काळ आई वडीला सोबत पोलीस स्टेशन गाठून शिक्षकाच्या विरोधात तक्रार दाखल करून पोलीसाने शिक्षकाच्या विरोधात विविध कलमाने व पोस्को दाखल करून पुढील तपास पोलीस उप अधिकारी झेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वानखेडे यांच्या नेतृत्वात त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत .
बातमी लिहे प्रर्यत आरोपी शिक्षक अद्यापही फरार आहे .