ताज्या घडामोडी

खेर्डा महादेव येथील अन्नत्याग उपोषण तुर्तास सुटले

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ खेर्डा महादेव येथे सुप्रसिद्ध भारूडकार श्री ह भ प त्रिंबक महाराज आम्ले यांनी दिनांक 28 ऑक्टोबर 2023 पासून बेमुदत अन्नत्याग उपोषण केले असून, दिनांक 2 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री नऊ वाजता माननीय मनोजजी जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर श्री ह भ प कृष्णा महाराज मिठे यांचे हस्ते फळांचा रस पिऊन त्रिंबक महाराज यांनीही उपोषण तूर्तास मागे घेतले आहे, श्री ह भ प त्र्यंबक महाराज यांचे अन्नत्याग उपोषण सहा दिवस होते, या सहा दिवसात समस्त गावकऱ्यांचे साखळी उपोषणही चालूच होते .

तसेच उपोषणाच्या सहाव्या दिवशी दिनांक 2 नोव्हेंबर 2023 रोजी गावातील सर्वच समाज बांधवांनी अण्णत्याग उपोषण केले या दिवशी गावात कोणाच्याही घरी चूल पेटली नाही, सदर सहा दिवसात विविध कीर्तनकार महाराजांनी या आंदोलनात सहभाग घेऊन रोज एक कीर्तन सेवा सादर केली. दिनांक तीन नोव्हेंबर 2023 रोजी उपोषण मागे घेतल्यामुळे श्री ह भ प त्रिंबक महाराज आमले यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली गावातील महिलांनी त्यांचे जागोजागी औक्षण केले

नंतर श्री ह भ प पंडित महाराज कुऱ्हे यांचे काल्याचे किर्तन झाले, आणि गावकरी मंडळींच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. माननीय जरांगे पाटलांनी सरकारला आरक्षणासाठी दोन जानेवारी 2023 पर्यंतचा अवधी दिला आहे, त्यामुळे त्रिंबक महाराजांनी अन्नत्याग उपोषण मागे घेतले असले तरीही, गावातील महिलांच्या वतीने साखळी उपोषणाचा कार्यक्रम 2 जानेवारी पर्यंत चालूच असणार आहे. व रात्री गावातील तरुणांचा ग्रुप उपोषण स्थळावर थांबणार आहे. अशी माहिती श्री शंकर आम्ले यांनी दिली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close