ताज्या घडामोडी

श्रीसाई जन्मस्थान मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी येथील प.पू.श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिरात श्रीसाई स्मारक समिती, पाथरी च्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मंगळवार दिनांक 12 जुलै 2022 ते गुरुवार दिनांक 14 जुलै 2022 गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होत असल्याची माहिती समितीचे कार्यकारी अधिकारी ॲड.श्री. मुकुंद चौधरी यांनी दिली.
या महोत्सवा विषयी बोलताना चौधरी म्हणाले की, आषाढ पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. श्रीसाईबाबा यांच्या हयातीतही गुरुपौर्णिमा कर्मभूमी शिर्डी येथे मोठ्या उत्साहात साजरी केली जायची. त्याचप्रमाणे प.पू.श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे सन 1999 पासून गेली तेवीस वर्ष हा उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. उत्सवाच्या आरंभदिनी मंगळवार दिनांक 12 जुलै रोजी पहाटे 5:15 वाजता श्रीसाईबाबांची काकड आरती होईल, त्यानंतर श्रींचे मंगल स्नान होईल, सकाळी 5:45 वाजता श्रीसाईबाबांच्या प्रतिमेची व श्रीसाई सच्चरित्र ग्रंथाची मंदिरातून द्वारकामाई मध्ये मिरवणूक निघेल. या मिरवणुकीमध्ये श्रीसाई सच्चरित्र ग्रंथ श्री.संजय भुसारी, विश्वस्त हे घेतील, श्रींची प्रतिमा आर्किटेक्ट श्री सुभाष दळी विश्वस्त हे घेतील, विणा श्री. सूर्यभान सांगडे कोषाध्यक्ष विश्वस्त हे घेतील. व मिरवणूक द्वारकामाईत पोहोचल्यानंतर अखंड पारायणास प्रारंभ होईल. या पारायणामध्ये पहिले अध्यायाचे वाचन श्री सीताराम सोमा धानु, अध्यक्ष हे करतील. सकाळी सात वाजता शिर्डी माझे पंढरपुर ही आरती होईल, सकाळी आठ वाजता विष्णुसहस्त्रनाम स्तोत्राचे सामुदायिक पठण होईल, प्रारंभ दिनी महाअभिषेक श्री सूर्यभान सांगडे, कोषाध्यक्ष विश्वस्त यांचे शुभहस्ते होईल, दुपारी साडेबारा वाजता माध्यान्ह आरती होईल. दुपारी साडेतीन वाजता श्री ह भ प भालचंद्र सरदेशपांडे यांचे सुश्राव्य कीर्तन होईल, सायंकाळी सहा वाजता राम रक्षा स्तोत्र हनुमान स्तोत्र व नंतर धुपारती नंतर पालखी मिरवणूक व हरिपाठ होईल. सायंकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेत निमंत्रित कलाकार सौ वृषालीताई पितळे यांची भजन संध्या होईल.
मुख्य दिवशी पहाटे साडे पाच वाजता प.पू. श्रीसाई बाबांचे कुलदैवत पंचबावडी हनुमान मंदिर येथे श्री.संजय भुसारी, विश्वस्त यांचे शुभ हस्ते महाभिषेक होईल. सकाळी आठ वाजता श्री.सीताराम धानु, अध्यक्ष यांचे शुभहस्ते प.पू.श्रीसाईबाबांना महाभिषेक होईल, तसेच ॲड.श्री. कालिदास चौधरी, विश्वस्त यांचे शुभहस्ते श्रीदत्तगुरुंना महाअभिषेक होईल, ॲड.श्री. अतुल चौधरी, सचिव तथा कार्यकारी विश्वस्त यांच्या शुभहस्ते महादेवाचा महारुद्र अभिषेक होईल.
सकाळी दहा ते बारा श्री ह भ प भालचंद्र सरदेशपांडे यांचे सुश्राव्य किर्तन होईल. सायंकाळी सहा वाजता श्रींची पाद्य पूजा, सायंकाळी साडेसहा वाजता धूप आरती व नंतर पालखी मिरवणूक आणि हरिपाठ होईल. सायंकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेत निमंत्रित कलाकार श्री ओंकार संसारे यांची भजन संध्या होईल.
उत्सव सांगतेच्या दिवशी आर्किटेक्ट श्री‌.सुभाष दळी, विश्वस्त यांचे शुभहस्ते महाअभिषेक होईल.
सांगतेच्या दिवशी सकाळी दहा वाजता श्री ह भ प भालचंद्र सरदेशपांडे यांचे काल्याचे कीर्तन होईल.
उत्सवाच्या मुख्य दिवशी तसेच सांगता दिवशी दैनंदिन पूजा – अर्चा, आरत्या नेहमीप्रमाणे होतील, मुख्यदिवशी 12:20 वाजता अर्की. सुभाष राजाराम दळी विश्वस्त यांचे शुभ हस्ते त्यांचे निशाणाचे पूजन करून निशाण मंदिराच्या शिखरावर उभारण्यात येईल, सांगतेच्या दिवशी सायंकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेत प्रसिद्ध भारुडकार श्री ह भ प त्रिंबक महाराज आमले यांच्या सांप्रदायिक भारुडाचा कार्यक्रम होईल.
उत्सवातील धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य योगेश गुरु ईनामदार वाळुजकर शास्त्री व अजय गुरु पाथरीकर हे करतील.
अशी माहिती समितीचे कार्यकारी अधिकारी, ॲड.श्री. मुकुंद चौधरी यांनी दिली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close