गोंडपिपरी येथील दलित मित्र वि.तू. नागापुरे डी.एड.कॉलेज च्या भव्य पटांगणावर तीन दिवसीय महिलांचे भव्य कबड्डी सामन्याचे आयोजन
तालुका प्रतिनिधी:महेश शेंडे गोंडपिपरी
असित बहुउद्देशीय सेवा संस्था विठ्ठलवाडा व महिला आर्थिक विकास महामंडळ तालुका गोंडपिपरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 11, 12 व 13 मार्च 2022 ला तीन दिवशीय महिलांचे कबड्डी सामने तसेच महिलांकरिता आरोग्य तपासणी व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन गोंडपीपरी येथील दलित मित्र वि तू नागापुरे डी. एड.कॉलेज गोंडपीपरी येथे ठेवण्यात आले आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून
महिलांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव मिळावा,त्याच्यात असणारी खेडाळू वृत्ती समोर यावी हा मुख्य उद्देश ठेवून सदर कार्यक्रम ठरविन्यात आला .
आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन आज दि .11 मार्च रोज शुक्रवारला गोंडपिपरी नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ.सविता कुडमेथे,व सह उदघाटक म्हणून जिल्हा परिषद सदस्य सौ.वैष्णवी अमर बोडलावार यांच्या हस्ते करण्यात आले.
मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व दीपप्रज्ज्वलन करून उदघाटनिय कार्यक्रम पार पाडला.दरम्यान महिला संघाचे
कबड्डी सामने खेळवण्यात आले.
सलग तीन दिवस महिलांकरिता विविध कार्यक्रम सुरू राहणार असून शेवटच्या दिवशी म्हणजेच13 मार्च ला महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे त्यामुळे तालुक्यातील महिलांनी सदर कबड्डी सामन्यात सहभाग नोंदवावा व तालुक्यातील महिला तथा पुरुष वर्गांनी उपस्थिती दाखवावी असे आवाहन आयोजक रेखा रामटेके, अमावस्या निमसरकर अध्यक्ष लोकसंचालित साधन केंद्र गोंडपिपरी यांच्याकडून करण्यात आले आहे.