काग येथे आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर

तालुका प्रतिनिधी:मंगेश शेंडे चिमुर
चिमूर :- सन्मानिय शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे लाड़के मुख्यमंत्री मा, उद्धवसाहेब ठाकरे यांचे वाढदिवसानिमित्य शिवसेना चंद्रपुर जिल्ह्या व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांचे संयुक्त विधमाने जन सेवा हिच ईश्वर सेवा या उद्देशाने आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी चा आज पहिला दिवस सार्वजनिक व्यासपीठ काग येथे सुरु आहे.

शिबिराचे उद्घाटन जेष्ठ शिवसैनिक रामकृष्णजी येरने यांचे हस्ते संम्पन झाले, यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमृतभाउ नखाते, विधानसभा समन्वयक भाऊराव ठोमबरे सौन्दरी ग्राम पंचायत सरपंच केवलरामजी पारधी, शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, निवासी उपतालुका प्रमुख सुधाकर निवटे, तालुका सम्बव्यक सचिन खाड़े, उपशहर प्रमुख सुभाष नंनावरे, उपतालुका प्रमुख मनोज लड़के, बांडु नेताम, विक्की मड़काम, दिगम्बर नैताम, संतोष कामडी, बालू चिलमवार, अमोल धोंगडे, शेखर धोंगड़े, अमित अमृतकर, राजेंद्र जाधव, सुनिल हिंगणकर व सर्व शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.