ताज्या घडामोडी

राष्ट्रीय सेवा योजना विशेष वार्षिक शिबिराचा समारोप

ग्रामीण प्रतिनिधी :रामचंद्र कामडी नेरी

नेरी येथील वाय.एस. पवार महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत दि. 25 मार्च ते 31 मार्च 2022 या कालावधित खुटाळा येथे विशेष वार्षिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातुन शिबिरार्थी विद्यार्थांनी खुटाळा गावात ग्रामसफाई , ग्रामस्वच्छता , सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे जनजागृती केली . स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्य कोरोना जनजागृती आणि मतदान जनजागृतीसाठी युवा शक्ती या संकलपनेवर आधारीत विशेष वार्षिक शिबिराचा समारोपीय कार्यक्रम दि.30 मार्च 2022 ला पार पडला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य धम्मदिप वैद्य सर , प्रमुख अतिथी म्हणुन रासेयो विभाग गोंडवाना विद्यापीठाच्या जिल्हा समन्वयक प्रा.डॉ. विजया गेडाम मॅडम , विभागीय समन्वयक प्रा.डॉ. उषा खंडाळे मॅडम , रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.सुनिल गभने सर , सुधाकर सोनवाने , तुलाराम बारसागडे , माधुरी बारसागडे , काजल श्रीराने , पपिता मसराम , इत्यादी ग्राम पंचायत सदस्य व सौ.मिनाक्षी गायकवाड पोलिस पाटील खुटाळा उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गभणे यांनी केले.प्रा.डॉ. विजया गेडाम यांनी आपल्या भाषनातुन शिबिराच्या माध्यमातुन विद्यार्थांनी सर्वागींन विकास साधावा असा संदेश दिला .विद्यार्थांनी अनुभव कथनाच्या माध्यमातुन वनराई बंधारा ,न्यालांची साफसफाई केली असे सांगीतले . अध्यक्षीय भाषनातुन प्रा. धम्मदिप वैद्य यांनी विद्यार्थांनी व्यक्तीमत्व विकास साधावा असा संदेश दिला. कार्यक्रमाचे प्रा. नरेंद्र मेश्राम तर आभार प्रा. जोत्सना रामटेके यांनी मानले शिबिराच्या यशस्वितेसाठी गावकरी , विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील प्रा.मेहरकुरे ,प्रा.कऱ्हाडे मॅडम ,प्रा.वाडगुरे मॅडम , लिपिक दिक्षांत रामटेके शिपाई स्वप्निल डांगे , पराग चावरे व खुटाळा वासिय ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close