ताज्या घडामोडी

मी परभणीत पुन्हा येईल…. पण भाजपचाच प्रचार करीन!

माजी मंत्री शिंदेंची समाजाच्या बैठकीत टोलेबाजी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

2019 च्या निवडणुकीत परभणीत प्रचाराला येऊन मी युतीचा प्रचार केला. 2024 च्या निवडणुकीत पुन्हा येईल, पण भाजपचाच प्रचार करील अशी टोलेबाजी माजी मंत्री राम शिंदे यांनी धनगर समाजाच्या बैठकीत गंगाखेड येथे बोलताना शनिवारी केली.

येथील प्रेरणा प्राथमिक विद्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील धनगर समाजाच्या पदाधिकारी ,कार्यकर्ते यांची संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती .या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विठ्ठल रबबडे होते. या बैठकीत बोलताना 2019 ला परभणी लोकसभेची निवडणूक धनगर समाजाचा उमेदवार लढवलेले सखाराम बोबडे पडेगावकर यांनी आपले अनुभव मांडले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत धनगर समाजाचा एकमेव उमेदवार म्हणून निवडणूक लढवताना मतदार संघातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी मतदारांनी केलेल्या मदत कधीही विसरणार नाही असे त्यांनी सांगितले. पण याच निवडणुकीत धनगर समाजाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवताना तत्कालीन मंत्री राम शिंदे यांनी माझ्या विरोधात प्रचार केल्याचा उल्लेख सखाराम बोबडे पडेगावकर यांनी बोलतांना केला. 2024 ची लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे सखाराम बोबडे पडेगावकर यांनी सांगितले.यानंतर बोलायला उठलेल्या माजी मंत्री राम शिंदे यांनी तुफान फटकेबाजी केली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मी प्रचारासाठी आलो होतो. सखाराम बोबडे यांच्या रूपाने धनगर समाजाचा उमेदवार उभा असतानाही मी युती धर्म पाळला. बोबडे तुम्ही लोकसभा निवडणूक लढवा. तुम्हाला माझ्याही शुभेच्छा आहेत.पण 2024 ला सुद्धा लोकसभेच्या प्रचारासाठी मी पुन्हा येईल आणि भाजपचाच प्रचार करेल. अशी टोलेबाजी मंत्री राम शिंदे यांनी केले. एकूणच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सर्व पक्षाकडून धनगर समाजाचे जास्तीत जास्त उमेदवार उभे करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावेळी सखाराम बोबडे पडेगावकर, आनंदराव बनसोडे, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ सुभाष कदम, माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंढे, सुरेश भुमरे आदींनी आपले विचार मांडले. यावेळी कृष्णा दळणर ,राजेश बालटकर ,नारायण शेंडगे, नारायणराव धनवटे ,आकाश लोहट ,मुंजाभाऊ लांडे ,जयदेव मिसे, नारायण बोबडे, कैलास हजारे, रामेश्वर जेगडे आदीसह जिल्ह्यातील समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि प सदस्य शंकर वाघमारे तर आभार प्रदर्शन प्राचार्य विश्वनाथ सोन्नर यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close