ताज्या घडामोडी

‘बामसेफ’ चे रविवारी ३५ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन

‘वामन मेश्राम फेेसबुक पेजवर वर्चुअल’आयोजित करण्यात आले आहे.

प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

बामसेफचे ३५ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन रविवार दि. ८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते ५ वाजेदरम्यान ‘वामन मेश्राम फेेसबुक पेज’वर वर्चुअल आयोजित करण्यात आले आहे.या अधिवेशनाचे उद्घाटन मुंबई मनपाचे माजी पर्यावरण उपायुक्त इंजि. लक्ष्मण व्हटकर यांच्या हस्ते होईल.या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम हे राहतील.दोन सत्रात होणाऱ्या‍ या अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.प्रथम सत्र दुपारी १२ ते २.३० वाजता होणार असून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे मूलनिवासी बहुजन समाजाचे शिक्षण संपवून गुलामी मजबूत करण्याचे षड्यंत्र आहे,केंद्र सरकार द्वारा लादलेले शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे,ओबीसींची जातनिहाय जनगणना न करणे,सार्वजनिक उपक्रमांचे खाजगीकरण, ‘वाढती महागाई व इतर अनेक ज्वलंत मुद्यांचे मूळ ईव्हीएम आहे’- एक विश्लेषण या विषयावर गोरखनाथ वेताळ,प्रा.डॉ.धनराज वाघमारे,प्रा. प्रकाश कांबळे हे मार्गदर्शन करतील.द्वितीय सत्र दुपारी ३ ते ५.३० वाजता सर्वोच्च न्यायालयाचा मराठा आरक्षण विरोधी निर्णय,महाराष्ट्र सरकारने एससी,एनटी,विजेएनटीचे पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करणे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींचे आरक्षण स्थगित करुन एससी,एसटीचे राजकीय आरक्षण कायम ठेवणे या मागील शासक जातीचे धोरण बहुजन समाजाला फोडा आणि राज्य करा असे आहे.बामसेफच्या अंतर्गत काम करणार्‍या सहयोगी संघटना प्रस्थापित केल्याशिवाय व्यवस्था परिवर्तनाचे उद्दिष्ट साध्य करणे असंभव आहे एक गंभीर चिंतन या विषयावर वक्ते सुनील भिरुड,बाळासाहेब मिसाळ पाटील,डॉ.दत्तात्रय जगताप,सुभाष राठोड,टी.जी.नाथभजन,सलीम शेख,राकेश गायकवाड आदी बोलणार आहे.या अधिवेशानात सहभागी होण्याचे आवाहन बामसेफचे परभणी जिल्हाध्यक्ष शिवाजी खोपे यांनी केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close