ताज्या घडामोडी

वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाच्या कुटुबियांची खासदार अशोकजी नेते यांची वडसा येथे सांत्वना भेट

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

देसाईगंज(वडसा):-तालुक्यातील फरी/झरी जंगल परिसरात महानंदा दिनेश मोहुर्ले वय अंदाजे (५६) वर्ष असे मृतक महिला असून ती शिवराज – फरी मार्गावर फरी तलावाच्या विरुद्ध बाजूला असलेल्या झुडपी जंगला लगत असणाऱ्या स्वतःच्या शेतावर गवत काढायला गेली होती. ती गवत काढत असतांना अचानक पट्टेदार वाघाने दबाधरुन हल्ला करुन ठार केले. हल्ला होताच महानंदाने प्राणांतिक किंकाळी फोडली. किंकाळीचा आवाज ऐकताच आजूबाजूच्या शेतात असलेले शेतकरी आणि मजूर आवाजाच्या दिशेने धावले. तेव्हा वाघ महानंदाचे शरीर ओढून नेत असल्याचे दिसून आले. लोकांनी मोठमोठ्याने आवाज करीत धाव घेतली असता वाघ पळून गेला. मात्र तोपर्यंत महानंदाचा मृत्यू झाला होता.

या संबंधितची माहीती खासदार अशोकजी नेते व आमदार कृष्णाजी गजबे यांना मिळताच लगेच त्यांनी घटनास्थळी ग्रामीण रुग्णालय वडसा येथे धावघेत त्या महिलेला पोस्टमार्टम साठी आणण्यात आले.
त्यावेळी खासदार अशोकजी नेते यांनी मृत्यू पावलेल्या महिलांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन .दुःख सावरण्याचं धिर देऊन सांत्वना केल. वनविभागाचे अधिकारी यांना तात्काळ वाघाला जेरबंद करा असे निर्देश देत वनविभाग शासनाच्या मार्फतीने मृत्यू पावलेल्या इसमाच्या कुटुंबीयांना आर्थिक पन्नास हजार रुपयाची तात्काळ मदत खासदार अशोकजी नेते व आमदार कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते देण्यात आली.

त्यावेळी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक नेते,आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाभाऊ गजबे,जेष्ठ नेते तथा लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, वनविभागाचे अधिकारी (RFO) विजय धांडे साहेब, लोकसभा समन्वयक तथा जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे,जिल्हा उपाध्यक्ष मोतीभाई कुकरेजा, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष बबलुभाई हुसैनी,युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनिल पारधी,जिल्हा संपर्क प्रमुख सदानंदजी कुथे, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी ,तसेच मोठ्या संख्येने गावकरी जनता उपस्थित होते.

या घटनेमुळे सध्या शेतातील निंदणी सुरू आहे. तसेच पाऊस पडल्याने पाणी करण्यासाठी व इतर शेतातील कामे करण्यासाठी अनेक शेतकरी बांधव सकाळच्या सुमारास शेतात जातात. मात्र, या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले.त्यामुळे गावकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या रोष व्यक्त करत वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करा अशी गावकऱ्यांनी यावेळी मागणी केली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close