शिरूर कासार डॉक्टर असोसिएशनची बैठक संपन्न
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
सध्या धकाधकीच्या जीवनामध्ये स्वतःचे आरोग्य अबाधित राखणे खूप महत्त्वाचे आहे.सध्या तरुणाई फास्ट फूड कडे जास्त आकर्षक होताना दिसते आहे.फास्ट फूड मुळे शरीरामध्ये चरबीचे प्रमाण वाढल्यामुळे हृदयरोग तयार होतात व इतरही आजारांना ते एक प्रकारच्या आमंत्रणच आहे. यामध्ये डॉक्टरांनी पण विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्या संदर्भात बीड येथील सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर अमित दुल्लावार सरांनी ‘लिपिड मॅनेजमेंट’ या विषयावर अगदी सखोल असे मार्गदर्शन केले.जुन्या आणि नव्या औषधांचा यावेळी सर्व डॉक्टरांना मार्गदर्शन केले. शरीरातील वाढलेल्या चरबीचे नियंत्रण कसे करायचे, कोणकोणती काळजी घेतली पाहिजे,कोण कोणता आहार घेतलापाहिजे, कोणते पदार्थ खाण्यामध्ये टाळले पाहिजेत. कोणत्या पदार्थाचा आहारामध्ये समावेश करावा. कोणकोणती औषधे वापरावीत.व्यायाम प्राणायाम इत्यादींचे योग्य असे मार्गदर्शन डॉक्टर अमित दुल्हावर सरांनी केले.
हा कार्यक्रम शिरूर येथील हॉटेल जय भवानी येथे पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी तथा वक्ते म्हणून डॉक्टर अमित दुल्लावार सरांनी उपस्थिती लावली. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर बडजाते,कार्यक्रमाचे प्रमुख डॉक्टर पालवे ,डॉक्टर जीतीन वंजारे,डॉक्टर निळेकर ,डॉक्टर ढाकणे,डॉक्टर जवरे इत्यादी प्रमूख उपस्थितीत होते यावेळी सर्व डॉक्टरांना डॉ. अमित दुल्लावार सरांनी लिपिड मॅनेजमेंट या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले.वाढलेली चरबी कशी कमी करावी यावर सल्लामसलत झाला आणि शंका कुशंका विचारण्यात आल्या तसेच डॉक्टर असोसिएशन संदर्भात प्रश्नांची विचारपूस झाली. सर्व डॉक्टरांच्या गाठी-भेटी नंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला आणि कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी हीमा डॉक्टर संघटनेचे जिल्हा महासचिव डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी डॉक्टर अमित दुल्लावार सरांचे आभार मानून त्यांचा पुष्पगूच्छ देऊन सत्कार केला.याप्रसंगी डॉक्टर दुल्लावार, डॉक्टर प्रकाश भोंडवे, डॉक्टर पालवे,डॉक्टर राऊत डॉक्टर, शेळके,डॉक्टरकेंद्रे,डॉक्टर लाटे, डॉक्टर सानप,डॉक्टर निळेकर, डॉक्टर ढाकणे, डॉ भिंगले, डॉ जितीन वंजारे,सोनवणे यांच्यासह अनेक डॉक्टर उपस्थित होते.